तिरुपती (आंध्र प्रदेश) - Janhvi visits Tirupati : अभिनेत्री जान्हवी कपूरने शुक्रवारी आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध देवस्थान तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. ती या मंदिराला भेट देणारी नियमित भाविक आहे. यावेळी ती तिचा कथित प्रियकर प्रियकर शिखर पहारिया आणि तिची मावस बहिण माहेश्वरी यांच्यासोबत देवदर्शनाला आली होती. कॉफी विथ करण सीझन 8 मध्ये शिखरसोबतच्या तिच्या नातेसंबंधाची कबुली दिल्यानंतर ती पहिल्यांदाच तिरुपती मंदिरात आली होती.
पहाटेच्या विधीच्या वेळी दोघांनी मंदिरात प्रवेश केला आणि दर्शनाचा लाभ घेतला. जान्हवी एका साध्या पण शोभिवंत सोनेरी साडीत सजलेली दिसत होती, तर शिखरने किरमिजी रंगाच्या कपड्यातले पांढरे धोतर नेसले होते. श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिराला वारंवार भेट देणाऱ्या जान्हवीने ऑगस्ट २०२३ मध्ये अखेरची भेट दिली होती.
सोशल मीडियावर जान्हवीने तिच्या तिरुपतीच्या भेटीची झलक शेअर केली आणि कॅप्शनसह साडी नेसलेल्या फोटोंची मालिका पोस्ट केली, "आता असे वाटते आहे की 2024 ची सुरुवात झाली आहे."
जान्हवी कपूरची मावस बहिण माहेश्वरी अय्यपन हीदेखील तिरुपती बालाजीची भक्त आहे. तेलुगू फिल्म इंडस्ट्रीत आघाडीच्या नायकांसोबत काम केल्यानंतर 2000 मध्ये तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर चित्रपट उद्योग सोडला. तिने 2008 मध्ये तिरुपती येथील सॉफ्टवेअर इंजिनियर जयकृष्ण यांच्याशी लग्न केले. ती सध्या आघाडीची फॅशन डिझायनर आहे. तिरुपतीला तिच्यासोबत आलेला तिचा कथित प्रियकर शिखर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा नातू आहे.
तिरुपती बालाजीचे हे मंदिर वेंकटेश्वराला समर्पित आहे, जो विष्णूचा अवतार मानला जातो. कलियुगातील आव्हानांपासून मानवतेला मुक्त करणे हा या दैवताचा उद्देश असल्याचे भक्तगण समजतात. त्यामुळे हे मंदिर कलियुग वैकुंठ म्हणूनही ओळखली जाते, आणि देवता कलियुग प्रथमाक्ष दैवम म्हणून ओळखली जाते.
वर्कफ्रंटवर, जान्हवी शेवटची वरुण धवनसोबत 'बवाल' चित्रपटामध्ये दिसली होती. 'मिस्टर आणि मिसेस माही' या चित्रपटात जान्हवी राजकुमार रावसोबत दिसणार आहे. 'उलझ' या चित्रपटात ती रोशन मॅथ्यू आणि गुलशन देवय्या यांच्यासोबत झळकेल तर 'देवरा' या चित्रपटात ती ज्युनियर एनटीआर आणि सैफ अली खान यांच्यासोबत तेलुगू सिनेमात पदार्पण करणार आहे.
हेही वाचा -