मुंबई - अभिनेता टायगर श्रॉफचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'स्क्रू ढिला'चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच दिग्दर्शक शशांक खेतान आणि टायगर श्रॉफ एकत्र काम करीत आहेत. ३ मिनीटांच्या या टिझरमध्ये टायगरच्या आक्रमक चपळतेची डोळ्यांची पारणे फेडणारी दृष्ये पाहायला मिळतात.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'स्क्रू ढिला' या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या वतीने करण्यात आली आहे. टिझरमध्ये टायगर श्रॉफ बांधलेल्या अवस्थेत दिसत असून त्याला संपूर्णपणे गुंडांनी घेरले आहे. त्याची ओळख विचारली जात असून त्यासाठी त्याला मारहानही होत आहे. आपण एक भारतीय स्पोर्टस टीचर असल्याचे तो सांगतो. दुसरीकडे एका मुलीला बांधून घातल्याचे दिसते. ती त्याला जॉनी या नावाने हाक मारते. त्यानंततर त्या मुलीलाही मारहान सुरू होते आणि नंतर टायगर आक्रमक होतो.
अभिनेता टायगर श्रॉफने व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर, चाहत्यांनी त्याच्या कमेंट विभागात विचारणा केली की यात "रश्मिका मंदान्ना कुठे आहे?" या चित्रपटात रश्मिकाच्या कास्टिंगचा खूप अंदाज व्यक्त केला जात आहे आणि निर्माते लवकरच तिच्या ऑन-बोर्ड येण्याबाबत तपशील जाहीर करू शकतील.
या चित्रपटातील इतर कलाकार, रिलीज तारीख, कथानक व इतर तपशील निर्मात्यांनी अजूनही गुलदस्त्यात ठेवला आहे. मात्र टायगर श्रॉफच्या चाहत्यांसाठी 'स्क्रू ढिला' हा चित्रपट मेजवानी ठरणार हे स्पष्ट दिसत आहे.
हेही वाचा - मिका दी वोहती: मिका सिंगने भावी पत्नी म्हणून आकांक्षा पुरीची केली निवड