ETV Bharat / entertainment

Country of blind teaser out : हिना खान स्टारर 'कंट्री ऑफ ब्लाइंड'चा टीझर झाला प्रदर्शित; पहा व्हिडिओ... - हिना खान चर्चेत

Country of blind teaser out : 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम हिना खानच्या आगामी 'कंट्री ऑफ ब्लाइंड'चा टिझर हा रिलीज झाला आहे. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

Country of blind teaser out
कंट्री ऑफ ब्लाइंडचा टीझर झाला प्रदर्शित
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 4:17 PM IST

मुंबई - Country of blind teaser out : 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री हिना खान सध्या चर्चेत आली आहे. हिनानं तिच्या वाढदिवसानिमित्त 'कंट्री ऑफ ब्लाइंड'चा टीझर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हा चित्रपट 6 ऑक्टोबर 2023 रोजी यूएसएमध्ये आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटामध्ये हिना ही यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसेल. 'कंट्री ऑफ द ब्लाइंड' हा चित्रपट एच.जी. वेल्सच्या लघुकथेवर आधारित आहे. 'कंट्री ऑफ द ब्लाइंड' चित्रपटामध्ये बाहेरच्या जगापासून अलिप्तपणे जगणाऱ्या एकाकी समाजाचे चित्र रेखाटले गेले आहे. या चित्रपटामध्ये या समुदायाला एका विनाशकारी रोगाने ग्रासले आहे, ज्यामुळे पुढील पिढ्या आंधळ्या झाल्या आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'कंट्री ऑफ द ब्लाइंड'चा टीझर झाला रिलीज : 'कंट्री ऑफ द ब्लाइंड'मध्ये हिना खान आणि शोएब निकाश शाह यांच्या मुख्य भूमिकेत आहेत. राहत शाह काझमी दिग्दर्शित आणि लिखित हा चित्रपट आहे. हिना खानच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. हिना खान टीझर रिलीज झाल्याबद्दल उत्साहित आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर हिना खाननं म्हटलं, 'कान्समध्ये पोस्टर लॉन्च झाल्यानंतर, यूएसएमध्ये रिलीज होणे ही एक मोठी गोष्ट आहे! मी रोमांचित आहे आणि आमच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी मी प्रतीक्षा करू शकत नाही'.असं तिनं कॅप्शन या टीझरच्या पोस्टवर केले आहे. या चित्रपटात इनामुलहक, प्रद्युमन सिंग मॉल, अनुष्का सेन, नमिता लाल, मीर सरवर, जितेंद्र राय, अहमर हैदर आणि हुसैन खान यांच्यासह अनेक प्रतिभावान कलाकार आहेत.

'कंट्री ऑफ द ब्लाइंड'बद्दल : 'कंट्री ऑफ द ब्लाइंड', रिलायन्स एंटरटेनमेंटद्वारे प्रदर्शित केला जात आहे. या चित्रपटाची निर्मिती रेहत शाह काझमी, तारिक खान, झेबा साजिद आणि नमिता लाल यांनी केली आहे. याशिवाय 'कंट्री ऑफ द ब्लाइंड या चित्रपटाची सहनिर्मिती जयंत जैस्वाल, जितेंद्र राय आणि अहमर हैदर केली आहे. या चित्रपटाची कहाणी अशा जगाची आहे, जिथे प्रत्येकजण आंधळे आहेत. त्यांच्या या जगात एक माणूस येतो, ज्याला डोळे आहे. हा माणूस या जगातील लोकांसाठी नवीन जगाचे दरवाजे उघडतो. चित्रपटाचा टीझर खूपच रोमांचक आणि मनोरंजक आहे. हिना खान आणि शोएब निक शाह यांचा दमदार अभिनय टीझरमध्ये दिसत आहे.

हेही वाचा :

  1. Gayatri Joshi Car Accident: इटलीमध्ये स्वदेश फेम अभिनेत्री गायत्री जोशीचा झाला कार अपघात
  2. Ramayana : रणबीर कपूर आणि सई पल्लवी पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर दिसणार एकत्र...
  3. Fighter : दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशनचे सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल; पहा फोटो...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.