ETV Bharat / entertainment

Shahids next with Rashmika : रश्मिका मंदान्नासोबत रोमान्ससाठी शाहीद कपूर सज्ज, अनीस बज्मी करणार दिग्दर्शन - रश्मिकाचा रोमँटिक कॉमेडी

अभिनेता शाहिद कपूर आणि रश्मिका मंदान्ना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अनीस बज्मीच्या आगामी कॉमेडी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. मुंबईसह यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानमधील लोकेशन्सवर हे शुटिंग पार पडेल.

Shahids next with Rashmika
रश्मिका मंदान्नासोबत रोमान्ससाठी शाहीद कपूर सज्ज
author img

By

Published : Jul 3, 2023, 1:18 PM IST

मुंबई - अलिकडेच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या फर्जी आणि ब्लडी डॅडी रिलीज झाल्यानंतर, बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर पहिल्यांदाच सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनीस बज्मीसोबत कॉमेडी चित्रपटात काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात शाहिद कपूरची नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना हिच्यासोबत जोडी जमणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मैं आऊंगा यूपी, बिहार लुटने या चित्रपटात शाहिद दुहेरी भूमिका साकारणार आहे.

शाहिद कपूर आणि रश्मिकाचा रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत प्रशटिंग सुरू होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार अनिस बज्मी आणि त्यांची तांत्रिक टीम डीओपी मनु आनंद आणि प्रॉडक्शन डिझायनर रजत पोद्दार यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानमधील ठिकाणे शुटिंगसाठी शोधलीआहेत. निर्मात्यांनी मुंबईत उभारलेल्या राजस्थानी हवेली या भव्य सेटवर पहिल्या शेड्यूलमध्ये मुख्य कलाकारांसह घरातील दृश्ये चित्रित करणार आहेत. चित्रपटाचे शीर्षक मैं आऊंगा यूपी, बिहार लुटने असे वेगळे असल्याने या चित्रपटाच्या कथानंकाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. अनिस बज्मी यांच्या नावावर नो एंट्री, वेलकम, सिंग इज किंग, रेडी, वेलकम बॅक, भूल भुलैया 2 यासह सर्वाधिक कमाई करणारे विनोदी चित्रपट दिग्दर्शक म्हणून आहेत. त्यामुळे याच पठडीतील आणखी एक धमाल सिनेमा पाहायला मिळणार अशी खात्री बाळगायला हरकत नाही.

मुंबईत 21 दिवसांच्या शुटिंगनंतर तीन आठवड्यांच्या शेड्यूलची समाप्ती होईल, त्यानंतर ते पुढील शूटिंग शेड्यूल सुरू करण्यासाठी राजस्थानला जातील. अधिक तपशीलासह अहवालात असे म्हटले आहे की दिग्दर्शकाने पुढील शेड्यूल सप्टेंबरच्या मध्यात सुरू करण्याचे आणि ऑक्टोबरपर्यंत चित्रपटाचा काही भाग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या वर्षाच्या अखेरीस शाहिद आणि रश्मिका स्टारर चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्याची निर्मात्यांची योजना आहे. हा चित्रपट दिल राजू आणि एकता कपूर यांनी संयुक्तपणे बनवला आहे.

दरम्यान, शाहिद कपूर आगामी क्रिती सेनॉनसह 'अन इम्पॉसिबल लव्ह स्टोरी'मध्येही दिसणार आहे. अमित जोशी आणि आराधना साह दिग्दर्शित हा चित्रपट ७ डिसेंबरला थिएटरमध्ये झळकणार आहे. दुसरीकडे, रश्मिका आगामी रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात दिसणार आहे, जो १ डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. तिच्याकडे सहकलाकार अल्लू अर्जुनसोबत 'पुष्प: द रुल' हा चित्रपट देखील आहे.

हेही वाचा -

१. Aa22 Release Dat : अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर धुमाकुळ घालणार

२. Harish Magon Passed Away : गोलमाल, नमक हलाल फेम अभिनेता हरीश मगन यांचे निधन

३. Adipurus Collection Day 17 : 'आदिपुरुष' बॉक्स ऑफिसवर होऊ शकतो क्लीन बोल्ड....कारण काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.