ETV Bharat / entertainment

Hema Malini : धर्मेंद्र-शबाना आझमी किसिंगबाबतच्या प्रश्नावर हेमा मालिनी यांचं... यूं कि, ये कौन बोला?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2023, 2:48 PM IST

Updated : Aug 26, 2023, 3:11 PM IST

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मधील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंगबाबत हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ऑनस्क्रीन किसिंगच्या प्रश्नावर हेमा यांनी दाखवलेल्या हजरजबाबीपणामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

Hema Malini
हेमा मालिनी

मुंबई : आयुष्मान खुराना अभिनीत 'ड्रीम गर्ल 2' सध्या कितीही चर्चेत असला तरी ओरिजिनल 'ड्रीम गर्ल' म्हणजे हेमा मालिनी जेव्हा मैदानात उतरते, तेव्हा अनेकांची बोलती बंद होऊन जाते. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस झाले आहेत. मात्र आताही या चित्रपटातील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनची चर्चा सुरूच आहे. धर्मेंद्र यांनी वयाच्या ८७व्या वर्षी शबाना आझमीसोबत हा सीन करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम लाभलं. तसंच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चं समीक्षकांनीही कौतुक केलं. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची केमिस्ट्री जबरदस्त होती. पण धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दरम्यान आता हेमा मालिनी यांनीही या किसिंग सीनवर आपली प्रतिक्रिया दिली.

हेमा मालिनी मोठ्या पडद्यावर झळकणार : नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत हेमा मालिनी यांना विचारण्यात आलं की, त्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट पाहिला आहे का? ज्यावर हेमा यांनी उत्तर दिलं, 'हा चित्रपट अजूनही पाहिला नाही'. यानंतर हेमा यांना विचारण्यात आलं की, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये धर्मेंद्रची भूमिका त्यांना दिली गेली असती तर त्यांनी स्वीकारली असती का? यावर 'शोले'तल्या बसंतीच्या स्टाईलमध्ये हेमा मालिनी यांनी उत्तर दिलं, 'हो नक्कीच स्वीकारली असती. जर ते चांगलं असेल किंवा चित्रपटाशी संबंधित असेल आणि चित्रपटाशी जुळत असेल तर कदाचित मी ते करेन'.

किसिंग सीनबद्दल धर्मेंद्र यांनी सांगितलं : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या धर्मेंद्र याना त्यांच्या किसिंग सीनबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की, चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अनेकांनी त्यांना हा प्रश्न विचारला होता. उत्तरादाखल धर्मेंद्र यांनी पत्रकारांसमोर म्हटलं होतं की, 'हा माझ्या उजव्या हाताचा खेळ आहे, जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही डाव्या हातानेही देखील मला खेळवू शकता.' या मिश्किल प्रतिक्रियेवर माध्यम प्रतिनिधींची हसून हसून मुरकुंडी वळली होती.

हेही वाचा :

  1. Gadar 2 vs OMG 2 box office collection day 15 : रिलीजच्या १५व्या दिवशी 'गदर २' आणि 'ओ माय गॉड २'च्या कमाईचा वेग मंदावला...
  2. Malaika Arjun Breakup : मलायका आणि अर्जुनचा ब्रेकअप? वाचा काय म्हणाली रिलेशनमध्ये ट्विस्ट आणणारी कुशा...
  3. Dream Girl 2 box office collection : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर 'ड्रीम गर्ल २'चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन...

Last Updated : Aug 26, 2023, 3:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.