ETV Bharat / entertainment

Guns & Gulaabs trailer out: राजकुमार राव, दुल्कर सलमानची मती गुंग करणारी गँगस्टर कॉमेडी - Guns and Gulaabs trailer out

राजकुमार राव आणि दुल्कर सलमान यांच्या भूमिका असलेल्या 'गन्स अँड गुलाब्स'चा ट्रेलर बुधवारी लॉन्च करण्यात आला. ९० च्या दशकातील फॅशन, स्टाईल आणि गाणी तुम्हाला नॉस्टेलजिक बनवतील. ही धमाल मालिका १८ ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर उपलब्ध होईल.

Guns & Gulaabs trailer out
'गन्स आणि गुलाब'चा नवीन ट्रेलर
author img

By

Published : Aug 2, 2023, 7:47 PM IST

मुंबई - ९० च्या दशकात घेऊन जाणारी भन्नाट कथा असलेला डॅशिंग मालिका 'गन्स आणि गुलाब'चा नवीन ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरची प्रतीक्षा चाहते बऱ्याच काळापसून करत होते. या ट्रेलरमध्ये जबरदस्त गँगस्टर कॉमेडी, जुनी गाणी, रोमँटिक वेडे प्रेमी युगुल आणि गँगस्टर्सची धमाल पाहायला मिळते. ही एक नव्या स्टाईलची हटके कॉमेडी प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी आहे याची खात्री ट्रेलर पाहून होते. यामध्ये ज्यामध्ये राजकुमार राव, दुल्कर सलमान, आदर्श गौरव, टीजे भानू आणि गुलशन देवय्या प्रमुख एपिसोड्समध्ये आहेत.

राजकुमार राव याच पूर्णपणे नवीन लूकमध्ये दिसत आहे. त्याची एक विशिष्ट केशभूषा आणि हातात बंदूक घेऊन वावरणे बरेच फनी आहे. तर दुसरीकडे, दुल्करला एक कठोर आणि धमकी देणारा गुंडा म्हणून भाव खाऊन जातो. त्यानंतर १९९० च्या हेअर स्टाईल आणि पोशाख असलेला गुलशन देवय्या आपण पाहतो. नेटफ्लिक्सच्या आगामी मालिका गन्स अँड गुलाब्समधील गुलशन देवैयाची स्टाईल ९० च्या दशकातील संजय दत्तच्या लूकने खूप प्रभावित आहे.

'गन्स आणि गुलाब' ही १९९० च्या दशकात तयार झालेली एक विनोदी क्राईम थ्रिलर मालिका आहे. राजकुमार राव, दुल्कर सलमान, आदर्श गौरव, गुलशन देवैया आणि टीजे भानू या उत्कृष्ट कलाकारांव्यतिरिक्त, यात श्रेया धन्वंतरी आणि पूजा ए गोर देखील आहेत. राज आणि डीके यांनी नेटफ्लिक्ससोबत दुसऱ्यांदा हातमिळवणी केली आहे. राज आणि डीके हे 'द फॅमिली मॅन' आणि 'फर्झी' या थ्रिलर मालिकेतील त्यांच्या दमदार दिग्दर्शनाबद्दल ओळखले जाते.

मिसफिट्स ऑफ द वर्ल्ड द्वारे प्रेरित गन्स आणि गुलाब ही वेब सिरीज नव्वदच्या दशकातील प्रणय कथा आणि गुन्ह्याचे एकत्रीकरण करते. गुन्हेगारी आणि हिंसाचाराच्या जगात सेट केलेले विनोद आणि रोमान्ससह प्रेम आणि बऱ्याच रंजक गोष्टींचा समावेश विनोदी पद्धतीने करण्यात आला आहे. ही मालिका १८ ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर उपलब्ध होईल.

हेही वाचा -

१. Ar Rahman Shocked : एआर रहमानची उडाली भीतीने गाळण, फहाद फासिलचा अवतार पाहून बसला धक्का

२. Koi Mil Gaya : 'कोई मिल गया'ची जादु कायम, २० वर्षांनंतर होणार पुन्हा रिलीज

३. Adah Sharma Hospitalised : फूड ऍलर्जी आणि डायरियामुळे अदा शर्मा रुग्णालयात दाखल...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.