ETV Bharat / entertainment

''घर- बंदूक-बिरयानी''चा गुढ टिझर रिलीज, आकाश ठोसर, सयाजी शिंदेसह नागराजचा नवा सिनेमा - सयाजी शिंदे

नागराज मंजुळेंच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्याच्या 'आटपाट' प्रॉडक्शनच्या नव्या सिनेमाची घोषणा काही दिवसापूर्वी झाली होती. ''घर- बंदूक- बिरयानी'' असे शीर्षक असलेल्या या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. 'सैराट' फेम आकाश ठोसर आणि प्रसिध्द अभिनेता सयाजी शिंदे यांच्याही यात मुख्य भूमिका आहेत.

Etv Bharat
''घर- बंदूक-बिरयानी''चा गुढ टिझर रिलीज
author img

By

Published : Oct 26, 2022, 3:19 PM IST

मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्याच्या 'आटपाट' प्रॉडक्शनच्या नव्या सिनेमाची घोषणा काही दिवसापूर्वी झाली होती. ''घर- बंदूक- बिरयानी'' असे शीर्षक असलेल्या या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात स्वतः नागराज भूमिका करणार असून 'सैराट' फेम आकाश ठोसर आणि प्रसिध्द अभिनेता सयाजी शिंदे यांच्याही यात मुख्य भूमिका आहेत.

नागराजने आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाचा टिझर प्रसिध्द केला आहे. टिझरची सुरुवात जंगलातील धमाक्याने होते. पोलीस आणि गुढ डाकू यांच्यात संघर्ष, चमकमक दिसते. परंतु ते लोक कोण आहेत याचा उलगडा झालेला नाही. ''घर- बंदूक- बिरयानी'' असे वेगळे शीर्षक असलेल्या या चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारा हा चित्रपट आहे हे टिझरवरुन निश्चित वाटत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

झी स्टुडिओज आणि नागराजची हा चित्रपट संयुक्त निर्मिती असणार आहे. या चित्रपटाचे संगीतकार आहेत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र. त्यांनी यापूर्वी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटाला संगीत दिले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत जंगल औताडे यांनी केले आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत रिलीज होणार आहे.

हेही वाचा - रवीना टंडनच्या वाढदिवशी, मुलगी राशाने शेअर केला दुर्मिळ थ्रोबॅक फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.