मुंबई - स्वातंत्र्याची 75 वर्षे आणि भारताच्या लोकांचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी, सांस्कृतिक मंत्रालयाने प्रसिद्ध सेलिब्रिटींचा समावेश असलेला 'हर घर तिरंगा' गीताचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. अमिताभ बच्चन, कपिल देव, विराट कोहली, अनुपम खेर आणि आशा भोंसले यांचा समावेश आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर कॅप्शनसह 'हर घर तिरंगा' गाण्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
सांस्कृतिक मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर कॅप्शनसह 'हर घर तिरंगा' गाण्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी लिहिले, "हर घर तिरंगा...घर घर तिरंगा...आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असताना आमच्या तिरंग्याला, आमच्या सामूहिक अभिमानाचे आणि एकतेचे प्रतीक असलेल्या या तिरंग्याला सलामी देऊन आपला तिरंगा साजरा करा."
-
Har Ghar Tiranga...Ghar Ghar Tiranga...
— Ministry of Culture (@MinOfCultureGoI) August 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Celebrate our Tiranga with this melodious salute to our Tricolour , the symbol of our collective Pride & Unity as our Nation completes 75 years of independence 🇮🇳#HarGharTiranga #AmritMahotsav pic.twitter.com/ECISkROddI
">Har Ghar Tiranga...Ghar Ghar Tiranga...
— Ministry of Culture (@MinOfCultureGoI) August 3, 2022
Celebrate our Tiranga with this melodious salute to our Tricolour , the symbol of our collective Pride & Unity as our Nation completes 75 years of independence 🇮🇳#HarGharTiranga #AmritMahotsav pic.twitter.com/ECISkROddIHar Ghar Tiranga...Ghar Ghar Tiranga...
— Ministry of Culture (@MinOfCultureGoI) August 3, 2022
Celebrate our Tiranga with this melodious salute to our Tricolour , the symbol of our collective Pride & Unity as our Nation completes 75 years of independence 🇮🇳#HarGharTiranga #AmritMahotsav pic.twitter.com/ECISkROddI
व्हिडिओमध्ये भारताचे चैतन्य, सामर्थ्य आणि देशाच्या क्रीडा, क्षेपणास्त्र प्रक्षेपण, सैन्यापासून ते आपल्या देशाच्या विविधतेचे प्रदर्शन पाहायला मिळत आहे.
ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आपला आवाज दिला आहे आणि अनुष्का शर्मा, तिचा पती विराट कोहली, अजय देवगण, अक्षय कुमार, कपिल देवसह दक्षिणेतील स्टार प्रभास देखील व्हिडिओमध्ये दिसत आहेत. प्रभास हा दक्षिण भारतातील एकमेव पुरुष अभिनेता आहे जो या अँथम व्हिडिओमध्ये झळकला आहे. व्हिडिओच्या शेवटी, पीएम मोदींनी त्यांच्या करिष्माई व्यक्तिमत्त्वाने विद्यार्थ्यांमध्ये सामील झालेले दिसतात.
'हर घर तिरंगा' ही आझादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत एक मोहीम आहे ज्यामुळे लोकांना तिरंगा घरी आणण्यासाठी आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या निमित्ताने तो फडकावण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
हेही वाचा - पतीच्या पायाची पूजा केलेली अभिनेत्री प्रणिताचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर