मुंबई - इशान खट्टर आणि वामिका गब्बी यांचा अलीकडील फुरसत हा अनोखा लघु चित्रपट अनेक कारणांनी चर्चेत आहे. विशाल भारद्वाज यांचा हा लघुपट, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून पाहाणाऱ्या चाहत्यांची संख्या वाढत आहे. चित्रपटाचे कथाकथन हे विस्तृत नृत्य क्रम असल्यामुळे इशान आणि वामिका दोघांचेही नृत्य कौशल्य पणाला लागले होते.
या चित्रपटातील भूमिकांना न्याय देण्यासाठी इशान आणि वामिकाने दोन आठवड्यांहून अधिक काळ समकालीन नृत्याचे कठोर प्रशिक्षण घेतले. याबद्दल बोलताना वामिका म्हणाली, "नृत्य हा भाषेचा एक प्रकार आहे जो विशाल सरांनी या चित्रपटात वापरला आहे. आम्ही बहुतेक समकालीन नृत्य स्टेप्स वापरल्या आहेत आणि मला जे थोडक्यात मिळाले ते म्हणजे, तुम्ही कुठे उभे आहात किंवा तुमची स्थिती कशी आहे, याचा विचार न करता, प्रत्येकाने हे केले पाहिजे. एकमेकांच्या आरशातल्या प्रतिमेसारखे दिसायचे. मी प्रशिक्षित कथ्थक नर्तक असूनही, मी दोन आठवड्यांहून अधिक काळ समकालीन नृत्याचे प्रशिक्षण घेतले आणि माझा सगळा मोकळा वेळ माझ्या शूटच्या दरम्यान सरावासाठी वापरला. सर्व कठोर परिश्रमांचे नुकतेच फळ मिळाले याचा आनंद आहे."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
विशेष म्हणजे फुरसत हा चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी अॅपल आयफोन 14 प्रो या फोनच्या मदतीने शुट केला आहे. एखाद्या मोबाईल कॅमेऱ्यावर इतका सुंदर चित्रपट शुट होऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. हा चित्रपट अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी जेव्हा हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांनी या चित्रपटाचे जोरदार कौतुक केले आणि त्यांची प्रतिक्रिया दिली. याबाबत त्यांनी एक ट्विटही केले आहे.त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'तुम्ही दिग्दर्शक विशाल भारद्वाजचा हा सुंदर बॉलीवूड चित्रपट पाहावा, काय होऊ शकते, जेव्हा तुम्ही भविष्य पाहाल, खूप चांगली सिनेमॅटोग्राफी आणि कोरिओग्राफी, सर्व सीन आयफोनने शूट करण्यात आले आहेत'. या ट्विटसोबत टीम कुकने चित्रपटाची यूट्यूब लिंकही शेअर केली आहे.
वामिका पुढे विशाल भारद्वाजच्या खुफियामध्ये तब्बू आणि अली फजलसह दिसणार आहे. दुसरीकडे, इशान शेवटचा 'फोन भूत' मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि कॅटरिना कैफसोबत दिसला होता. तो मृणाल ठाकूर आणि प्रियांशू पैन्युली यांच्यासोबत आगामी पीरियड वॉर चित्रपट 'पिप्पा' मध्ये दिसणार आहे. (ANI)
हेही वाचा - PK Rosy Google : भारतातील पहिल्या दलित अभिनेत्रीचा गुगल डूडलमार्फत सन्मान, जाणून घ्या त्यांचे जीवनकार्य