ETV Bharat / entertainment

Malayalam Actor Innocent : प्रसिद्ध मल्याळम अभिनेते आणि माजी लोकसभा खासदार इनोसंट यांचे निधन - मल्याळम अभिनेते इनोसंट यांचे निधन

प्रसिद्ध मल्याळम विनोदी अभिनेते इनोसंट यांचे निधन झाले. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या इनोसंट यांना 3 मार्च रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असताना त्यांचा मृत्यू झाला.

Malayalam Actor Innocent
इनोसंट
author img

By

Published : Mar 27, 2023, 7:12 AM IST

कोची (केरळ) : लोकसभेचे माजी खासदार आणि प्रसिद्ध चित्रपट अभिनेते इनोसंट यांचे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. त्यांचे पूर्ण नाव इनोसंट वीरेड थेकेथला आहे. कोची येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते गेल्या अनेक वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होते. कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात इनोसंट हे सर्वांसाठी एक आदर्श आणि प्रेरणा होते.

750 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या : इनोसंट हे मल्याळम सिनेमातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी खलनायक, विनोदी आणि चरित्र भूमिकांमधून लोकांचे मनोरंजन केले. कष्ट आणि गरिबीत वाढलेल्या या अभिनेत्याने आपल्या अभिनयाने मल्याळम चित्रपटसृष्टीवर बराच काळ राज्य केले. इनोसंट यांनी केरळमधील 'अम्मा' या चित्रपट कलाकारांच्या संघटनेचे अध्यक्षपदही भूषवले आहे. मल्याळम, तमिळ आणि हिंदी भाषांमधील सुमारे 750 चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या इनोसंट यांना राज्य सरकारचे तीन पुरस्कार मिळाले आहेत. तसेच 2021 चा सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रासाठीचा केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कारही इनोसंट यांना मिळाला आहे.

राजकारणातही हात आजमावला : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत, इनोसंट यांनी सीपीएमच्या पाठिंब्याने चालकुडी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि मोठा विजय मिळवला. लोकसभेत केरळच्या सार्वजनिक समस्यांबरोबरच, इनोसंट यांनी कर्करोगाविरुद्धच्या लढ्याकडे देखील देशाचे लक्ष वेधले. त्यांनी 2019 मध्ये चालकुडीमधून पुन्हा निवडणूक लढवली. पण यावेळी त्यांना अपयश आले.

अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका : इनोसंट यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1948 रोजी इरिंजलकुडा, त्रिशूर येथे वारीद थेकेथला यांच्या घरी झाला. ते एकूण आठ भावंड होते. रामजी राव स्पीकिंग, मन्नार मथाई स्पीकिंग, किलुकुम, गॉडफादर, व्हिएतनाम कॉलनी, देवसूराम या सुपरहिट चित्रपटांमधील इनोसंटचा अभिनय मल्याळम सिनेमा अस्तित्वात असेपर्यंत स्मरणात राहील. तसेच काबुलीवाला, गजकेसरीयोगम, मिथुनम, माझविल्कावाडी, मानसीनाकरे, थुरुपुगुलन, रासथंथ्रम आणि महासमुद्रम यांसारख्या चित्रपटांमधील विनोदी भूमिकांसह गंभीर भूमिकांमध्ये त्यांनी केलेले अभिनय अपवादात्मक होते. जेव्हा जेव्हा नायक आणि खलनायकाच्या भूमिकेत सुपरस्टार्ससोबत इनोसंट झळकले तेव्हा ते चित्रपट यशस्वी ठरले आहेत.

हेही वाचा : Akanksha Suicide Case : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेची आत्महत्या, चाहते म्हणाले- 'ही बातमी खोटी....'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.