मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा 'जवान' आणि रणवीर सिंग आणि आलिया भट्टचा 'रॉकी रानी की प्रेम कहानी'नंतर आता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'ओह माय गॉड २' टीझर देखील टॉम क्रूझच्या आगामी अॅक्शन- हॉलीवूड चित्रपट मिशन इम्पॉसिबल ७च्या प्रदर्शनाच्या वेळी दिसणार आहे. ही अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दरम्यान टॉम क्रूझचा मिशन इम्पॉसिबल ७ पाहण्यासाठी जाणाऱ्या प्रेक्षकांना एकाच वेळी चार चित्रपटांचा आनंद लुटता येणार आहे.
मिशन इम्पॉसिबल ७ : टॉम क्रूझ स्टारर चित्रपट मिशन इम्पॉसिबल ७ हा १२ जुलै रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या मध्यंतरात शाहरुख खानच्या आगामी थ्रिलर चित्रपट 'जवान'चे ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. ही बातमी समजल्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, रणवीर सिंग आणि आलिया भट्ट स्टारर रोमँटिक-फॅमिली ड्रामा 'रॉकी रानी की प्रेम कहानी, या चित्रपटाचा ट्रेलर देखील यावेळी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'रॉकी रानी की प्रेम कहानी'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असला तरी चित्रपटाच्या मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
ओह माय गॉड २ : दरम्यान सध्याला आता चाहते अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड २' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स समोर आले आहेत आणि अक्षयचे चाहते आता चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरची प्रतीक्षा करत आहेत. तसेच १० जुलै रोजी या चित्रपटाचे टीझर डिजिटल स्वरूपात प्रदर्शित होणार आहे. 'ओह माय गॉड २'चा टीझर १.३४ मिनिटांचा असणार आहे. 'ओ माय गॉड २' हा चित्रपट ११ ऑगस्टला रिलीज होणार आहे. सनी देओलचा 'गदर २' हा चित्रपटही याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. तर 'रॉकी रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट २८ जुलैला आणि जवान ७ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. म्हणजेच एका लागोपाठ एक चित्रपट हे फार धमाकेदार येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे या काही काळात फार मनोरंजन होणार आहे.
हेही वाचा :