मुंबई - कॅम्पस कॉमेडी ड्रामा असलेला डॉक्टर जी ( Doctor G ) हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी सोमवारी जाहीर केले. आयुष्मान खुराना आणि रकुल प्रीत सिंग ( Ayushmann Khurrana and Rakul Preet Singh ) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून अनुभूती कश्यप ( Anubhuti Kashyap ) दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
आयुष्मानने या चित्रपटाची रिलीज डेट सोशल मीडियावर शेअर केली आहे. "जिंदगी है मेरी फुल ऑफ गुगली, चाहिये था ऑर्थोपेडिक्स, पर बन गया डॉक्टरजी 🧑🏻⚕️ तुमच्या अपॉयमेंटसाठी तयार रहा. #DoctorG तुम्हाला 14 ऑक्टोबर 2022 पासून थिएटरमध्ये तुमच्यासाठी हजर राहिल.''
आयुष्मान त्याच्या अष्टपैलुत्वासाठी ओळखला जातो. त्याच्या प्रत्येक कामगिरीने, अभिनेता नेहमी प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतो आणि डॉक्टर जी चित्रपटात तो त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच स्त्रीरोग तज्ञाची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे.
अनुभूती कश्यप दिग्दर्शित डॉक्टर जी चित्रपटातील कलाकारांमध्ये डॉ. फातिमा दुग्गलच्या भूमिकेत रकुल प्रीत सिंग आणि डॉ. नंदिनी भाटियाच्या भूमिकेत शेफाली शाह यांचा समावेश आहे. निर्मात्यांनी 14 जुलै 2021 रोजी भोपाळमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते.
याआधी, निर्मात्यांनी स्टार कास्टचा पहिला लुक लॉन्च केला होता, हा चित्रपट 17 जून 2022 रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु काही कारणांमुळे तो पुन्हा शेड्यूल करण्यात आला. डॉक्टर जी हा एक सामाजिक-विनोदी चित्रपट आहे जो प्रेक्षकांना एक विशेष संदेश देखील देईल.
दरम्यान, आयुष्मान आगामी जयदीप अहलावतसोबत अॅक्शन हिरोमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ३ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. २९ जून २०२३ रोजी त्याचा ड्रीम गर्ल २ देखील प्रदर्शित होणार आहे.