ETV Bharat / entertainment

बर्थडे स्पेशल: पत्नी जेनेलिया डिसूझासोबत रितेश देशमुखचे 5 सुंदर व्हिडिओ - Ritesh Deshmukh comic timing

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आज त्याचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याची आणि जेनेलियाची ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन केमेस्ट्री खूपच लय भारी राहिली आहे. दोघे नहमी मजेशीर रील बनवत असतात. अशाच पाच सुंदर रील्सचे व्हिडिओ आपण पाहूयात.

अभिनेता रितेश देशमुख
अभिनेता रितेश देशमुख
author img

By

Published : Dec 17, 2022, 10:25 AM IST

Updated : Dec 17, 2022, 12:14 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख त्याचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. मराठमोळ्या रितेशने गेल्या 2 दशकांमध्ये प्रेक्षकांना त्याच्या कॉमिक टाइमिंग आणि खेळकर आकर्षणाच्या प्रेमात पाडून अनेक वर्षांपासून त्यांची मने जिंकली आहेत.

सहज सुंदर अभिनयासोबतच रितेशने त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा हिच्यासोबत त्याच्या इन्स्टाग्रामवर धमाल मजा मस्तीचे व्हिडिओ सादर करुन त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन केले. तिला जिममध्ये खेचण्यापासून ते तिच्यासोबत डान्स रूटीन करण्यापर्यंत, या दोघांमध्ये शेअर केलेल्या 5 सर्वात सुंदर क्षणांवर एक नजर टाकूया.

या आनंदी क्यूट व्हिडिओमध्ये जेनेलियाने रितेशसोबत एक विनोद शेअर केला आहे. ती म्हणाली, "एक जोडपे होते, आणि बायकोची वागणूक खूप शांत स्वबावाची होती," ती असे म्हणताच रितेश हसायला लागतो. शेवटी जेनेलियाचा चिडलेला लूक पाहून रितेशला चूक झाल्याची जाणीव होते. या व्हिडिओतून या स्टार नवरा-बायकोचे नाते विनोदी पद्धतीने दिसून आले.

दिवाळीच्या दिवशी, रितेशने व्यायामशाळेच्या उपकरणांभोवती दोरीने खेचत त्याची स्नायू शक्ती दाखवली. तथापि, व्हिडीओचा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा जेनेलियालाही सोबत ओढले जात असताना बिनधास्त पद्धतीने डान्स करताना दिसते. अखेर दोघे गळाभेट घेतात आणि रितेश दिवाळीच्या शुभेच्छा देतो.

रितेश आणि जेनेलिया समुद्रकिनारी फिरत असताना, "जो आती तो मेरे कंधे तक भी नहीं, पर चढी मेरे सार पर रहती है" असे मजेशीर विधान असलेला आवाज आपल्याला व्हॉईसओव्हरमध्ये ऐकायला येतो.

"जब अपनी ही बीवी से प्यार हो जाये" असे कॅप्शन दिलेल्या या व्हिडिओत रितेश ओठ सिंग करताना मजेशीर परफॉर्मन्स देतो. नंतर जेनेलियाही त्याला मागून आलिंगन देते.

या व्हिडिओमध्ये चल चल चल असे कॅप्शन दिलेले बॉलिवूड जोडी एकाच वेळी गोंडस, रोमँटिक आणि मजेदार होताना दिसते. मॉर्निंग वॉक दरम्यानचा हा त्यांचा व्हिडिओ खूपच सुंदर बॉन्डिंग दाखवणारा होता.

हेही वाचा -Fake Passport :अभिनेत्री ऐश्वर्या रायचा बनावट पासपोर्ट जप्त ; नायजेरियन टोळीला अटक

Last Updated : Dec 17, 2022, 12:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.