ETV Bharat / entertainment

Bigg Boss OTT 2 : विदेशी स्पर्धक जैद हदीदने बिग बॉसचे घर सोडण्याची दिली धमकी... - टॉर्चर टास्क

'बिग बॉस ओटीटी २' शोमध्ये आलेला विदेशी स्पर्धक जैद हदीदने बिग बॉसचे घर सोडण्याची धमकी दिली आहे. बिग बॉसचे घर सोडायचे काय कारण असू शकते हे जाणून घ्या...

Bigg Boss OTT 2
बिग बॉस ओटीटी २
author img

By

Published : Jul 8, 2023, 4:57 PM IST

मुंबई : बिग बॉस ओटीटी २ हा शो दिवसेंदिवस वादग्रस्त होत आहे. शोमधून आधी चार स्पर्धक घर सोडून गेले आहे. दरम्यान आता परदेशी स्पर्धक जैद हदीदने शो सोडण्याची धमकी दिली आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये आकांक्षा पुरीसोबत लिप लॉक केल्यानंतर जैद हदीद प्रसिद्धीझोतात आला. या चुंबनानंतर सलमान खानने आकांक्षा पुरीला शोमधून काढून टाकले. तसेच गेल्या एपिसोडमध्ये जैद हदीद हा बेबी ध्रुववर थुंकला होता. जैद त्यावेळी फार रागात होता. या घटनेनंतर जैद हदीदने सलमान खानची हात जोडून माफीही मागितली होती. पण आता नुकतेच त्याने घर सोडण्यातची धमकी दिली. त्यानंतर तो आपले सामान पॅक करायला लागला.

टॉर्चर टास्क : घराच्या कॅप्टन जिया शंकरसाठी टॉर्चर टास्क दरम्यान, बाबिका आणि जैद समोरासमोर आले होते. टॉर्चर टास्कमध्ये मर्यादा ओलांडल्याबद्दल बाबिकाने जैदला खूप जास्त फटकारले होते आणि दुसरीकडे जैदला बबिकाचा फार राग आला होता. त्यानंतर तिला उत्तर देताना तो थुंकला. बबिकाने जैदचे पूर्ण वैयक्तिक आयुष्य घरातच उखडून काढले, यादरम्यान जैद नाराज झाला आणि त्याला रडू आले. बाबिकाने सांगितले की, जैदची पहिली पत्नी चांगली होती, पण जैदला अशा जोडीदाराची गरज होती जी प्रत्येक गोष्टीत त्याला होकार देईल.

खरंच जैद सोडणार घर : दरम्यान, जेव्हा संपूर्ण घरामध्ये जैदचा असा अपमान होऊ लागला तेव्हा त्याने सांगितले की तो शो सोडत आहे आणि हा शो त्याच्यासाठी बनलेला नाही. सध्याला जैदचे रडणारे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. आता जैद खरंच घर सोडणार का? हे येणाऱ्या काळात समजेल.

घरातील नॉमिनेट सदस्य : सायरस भरुचा, पूजा भट्ट, जैद हदीद, मनीषा राणी, फलक नाज, बाबिका ध्रुवे आणि अविनाश सचदेव यांना या आठवड्यात नॉमिनेट करण्यात आले आहे. आता येणाऱ्या एपिसोडमध्ये कोण घराच्या बाहेर जाणार हे लवकरच माहित होईल.

हेही वाचा :

  1. Monsoon love: मलायका आणि अर्जुन कपूरची रोमँटिक मान्सुन मुडमध्ये डिनर डेट
  2. Oh My God 2 Teaser : 'ओह माय गॉड २' टीझरची प्रतीक्षा संपली, मिशन इम्पॉसिबल ७ च्या रिलीजसोबत सुरू होणार प्रमोशन
  3. Neetu Singh Birthday : आलिया भट्टने सासू नीतू सिंगला राणी म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.