ETV Bharat / entertainment

अमिताभ यांचा नातू अगस्त्य नंदा चित्रपट पदार्पणासाठी सज्ज - अगस्त्य नंदा बॉलिवूड पदार्पण

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर नातू अगस्त्य नंदा याला चित्रपट पदार्पणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नेटफ्लिक्सच्या 'द आर्चीज' या लाइव्ह-अ‍ॅक्शन म्यूझिकल चित्रपटाचे त्याने शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटातून शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरदेखील पदार्पण करणार आहेत.

अमिताभ यांचा नातू अगस्त्य नंदा
अमिताभ यांचा नातू अगस्त्य नंदा
author img

By

Published : Apr 19, 2022, 10:46 AM IST

मुंबई - अमिताभ यांचा नातू अगस्त्य नंदा चित्रपट पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. नेटफ्लिक्सच्या द आर्चीज या लाइव्ह-अ‍ॅक्शन म्यूझिकल चित्रपटाचे त्याने शूटिंग सुरू केले आहे. त्याच्या या पदार्पणाचा अभिमान वाटत असल्याचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी सोमवारी सांगितले. श्वेता बच्चन नंदा आणि उद्योगपती निखिल नंदा यांचा मुलगा अगस्त्य हा झोया अख्तरच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या चित्रपटात लाडके कॉमिक बुक पात्र आर्ची अँड्र्यूजच्या भूमिकेत आहे.

नेटफ्लिक्सच्या द आर्चीज या चित्रपटातून अगस्त्य नंदासह शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर हे स्टार किड्स सिनेक्षेत्रात पदार्पण करीत आहेत. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एका चाहत्याचे ट्विट शेअर केले आहे. "अगस्त्य... तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होत आहे आणि आपल्या सर्वांमध्ये यापेक्षा मोठा आनंद असू शकत नाही. माझे आशीर्वाद, प्रेम आणि माझ्या सदैव शुभेच्छा.. चांगले कर.. आणि झेंडा फडकत ठेव," असे अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे.

द आर्चीजची निर्मिती झोया अख्तर आणि तिची दीर्घकाळची सहकारी रीमा कागती यांनी त्यांच्या प्रॉडक्शन हाऊस टायगर बेबी अंतर्गत केली आहे. निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी सुहाना खान वेरोनिका लॉजच्या भूमिकेत दिसणार आहे, तर खुशी बेट्टी कूपरच्या भूमिकेत दिसणार आहे. या तिघांना मार्चमध्ये चित्रपटाच्या सेटवर कॉस्चूम टेस्टच्यावेळी पाहण्यात आले होते.

हेही वाचा - शाहरुखच्या प्रेमळ मिठीतील शहनाज गिलचा व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.