नवी दिल्ली - शनाया कपूरने अलीकडेच इंस्टाग्रामवर ग्लॅमरस निळ्या पोशाखात स्वत:च्या फोटोंचा एक सेट पोस्ट केला आहे. परंतु सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे तिच्या सर्वात जवळची मैत्रिण सुहाना खानने त्यावर दिलेल्या कमेंटने. इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करत, शनायाने लिहिले, "प्रत्येक मुलीसाठी निळ्या रंगाची छटा असते." यावर तिने जीभ बाहेर काढणारा इमोजी आणि निळ्या हृदयाच्या इमोजीसह प्रतिक्रिया दिली. त्यानंतर तिची जिवलग मैत्रिण सुहाना खान तिच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देण्यासाठी सरसावली. तिने पोस्टच्या कमेंट विभागात डोळ्यांच्या इमोजीसह "स्टनिंग" असे लिहिले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
शनायाची आई आणि फॅब्यूलस लाईव्ह ऑफ बॉलिवूड वाइव्जची अभिनेत्री महीप कपूर आणि तिची सह कलाकार नीलम कोठारी यांनीही पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या. महिप कपूरने निळ्या रंगाचा हार्ट इमोजी टाकला आणि नीलम कोठारीने स्पार्कलिंग हार्ट इमोजी टाकला.
शनाया आणि सुहाना नुकतेच त्यांच्या आई महीप कपूर आणि गौरी खान यांच्यासोबत दुबईला सुट्टीवर गेल्या होत्या. काही दिवसांपूर्वी, शनायाने दुबईहून तिच्या इंस्टाग्राम हँडलवर स्वतःच्या फोटोंचा सेट शेअर केला होता. फोटोंमध्ये शनाया पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करताना दिसली हगोती. तिच्या कॅप्शननुसार, तिची बेस्ट फ्रेंड ( BFF ) सुहाना खानने तिच्यासाठी हे फोटो काढले.
सुहाना खान शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी आहे. ती लवकरच झोया अख्तरच्या 'द आर्चीज'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दरम्यान, शनाया कपूरही तिच्या मोठ्या बॉलिवूड पदार्पणाची तयारी करत आहे. ती शशांक खेतानच्या आगामी 'बेधडक' या चित्रपटात दिसणार आहे, ज्याला करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचे समर्थन आहे.
हेही वाचा - हुमा कुरेशी आणि सोनाक्षीचा धमाल 'डबल एक्सएल' टीझर रिलीज