ETV Bharat / entertainment

Dream Girl 2 release date : जवान आणि आदिपुरुषसोबत टक्कर टाळण्यासाठी ड्रीम गर्ल 2 चे रिलीज लांबणीवर - ड्रीम गर्ल चा सीक्वेल

आयुष्मान खुराना आणि अनया पांडे यांच्या आगामी चित्रपट ड्रीम गर्ल 2 च्या मेकर्सने चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर केली. रोमँटिक कॉमेडी असलेला हा चित्रपट 7 जुलै रोजी मोठ्या पडद्यावर येणार होता, तो आता ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हुढे ढकलला गेला आहे.

ड्रीम गर्ल 2 चे रिलीज लांबणीवर
ड्रीम गर्ल 2 चे रिलीज लांबणीवर
author img

By

Published : Apr 24, 2023, 12:47 PM IST

मुंबई - आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला आगामी रोमँटिक कॉमेडी ड्रीम गर्ल 2 चित्रपटाचे रिलीज ऑगस्टमध्ये ढकलला जात आहे. निर्मात्यांनी सोमवारी सोशल मीडियाद्वारे ड्रीम गर्ल 2 ची नवीन रिलीज तारीख जाहीर केली. हा चित्रपट पूर्वी ७ जुलै रोजी मोठ्या पडद्यावर येणार होता पण आता महिनाभरानंतर चित्रपटगृहात दाखल होईल.

ड्रीम गर्ल 2 निर्मात्यांचे ट्विट - ड्रीम गर्ल 2 ची निर्मिती एकता कपूरच्या चित्रपट निर्मिती बॅनर बालाजी मोशन पिक्चर्सद्वारे केली जात आहे. ड्रीम गर्ल 2 ची नवीन रिलीज डेट बॅनरच्या सोशल मीडिया हँडल्सवर पोस्टसह घोषित करण्यात आली. सुधारित तारखेला अपडेट शेअर करताना, निर्मात्यांनी पूजा उर्फ आयुष्मानच्या 'आशिक' ला उद्देशून एक विचित्र पोस्ट शेअर केली आणि लिहिले, 'पचीस बडी है मस्त मस्त, क्यूंकी ड्री म गर्ल आ रही है 25 अगस्त को'., असे लिहिले आहे. 25 ऑगस्ट 2023 रोजी ड्रीम गर्ल 2 चित्रपटगृहात झळकणार आहे.

ड्रीम गर्ल चा सीक्वेल - ड्रीम गर्ल 2 हा आयुष्मानच्या 2019 मध्ये रिलीज झालेल्या ड्रीम गर्लचा सीक्वल आहे जो बॉक्स ऑफिसवर खूप गाजला होता. आयुष्मान आणि अनन्या व्यतिरिक्त, दुसऱ्या भागात असरानी, अन्नू कपूर, परेश रावल, मनजोत सिंग आणि विजय राज यांच्याही भूमिका आहेत.

ड्रीम गर्ल २ रिलीज पुढे ढकलण्याचे कारण - ड्रीम गर्ल 2 ची नवीन रिलीज तारखेची योजना शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित आउटिंग जवानपासून चित्रपटाचे रक्षण करण्यासाठी समजली जात आहे. किंग खानचा जवान 2 जून रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. शाहरुखचा चित्रपट पुढे ढकलल्या जात असल्याच्या बातम्या पसरत आहेत, तथापि, निर्मात्यांकडून अद्याप याबाबत अधिकृत सांगण्यात आलेले नाही. आणखी एक मोठा चित्रपट ड्रीम गर्ल २ च्या निर्मात्यांना त्रासदायक ठरु शकतो तो म्हणजे आदिपुरुष. प्रभास आणि क्रिती यांच्या भूमिका असलेला आदिपुरुष 16 जून रोजी रुपेरी पडद्यावर येणार आहे. हे सर्व लक्षात घेऊनच ड्रीम गर्ल २ च्या निर्मात्यांनी सिनेमा ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - Amitabh Bachchan Tweet On Blue Tick : ए ट्विटर खेल खतम, पैसे हजम.. बिग बींनी पुन्हा घेतली ट्विटरची फिरकी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.