ETV Bharat / entertainment

Aayush Sharma Birthday: सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माला पत्नी अर्पिता खाननं दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा

Aayush Sharma Birthday: सलमान खानचा मेहुणा आणि बॉलिवूड अभिनेता आयुष शर्मा आज 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी त्याची पत्नी अर्पिता खाननं त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Aayush Sharma Birthday
आयुष शर्माचा वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 11:33 AM IST

मुंबई - Aayush Sharma Birthday: सलमान खानचा मेहुणा आणि बॉलिवूड अभिनेता आयुष शर्मा आज 26 ऑक्टोबर रोजी आपला 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी त्याला त्याची पत्नी अर्पिता खाननं इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये सुंदर सजावटीसह हॅपी बर्थडे आयुष असं लिहण्यात आलंय. अर्पिता खाननं या खास प्रसंगी आयुषला सुंदर सप्राईज दिलं आहे. या खास दिवशी त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं इंस्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अनेकांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

आयुष शर्माचा वाढदिवस : सोशल मीडियावर आयुष आणि अर्पिता आपल्या कुटुंबासह अनेक फोटो शेअर करत असतात. हे जोडपे अनेकदा कार्यक्रमांमध्ये देखील एकत्र स्पॉट होतात. सलमान खाननेच आयुषला फिल्म इंडस्ट्रीत पहिली संधी दिली होती. त्यानं 'लव्ह यात्री' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. 'लव्ह यात्री' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 18.14 कोटीची कमाई केली होती. या चित्रपटाचा बजेट 32 कोटी होता. 'लव्ह यात्री' चित्रपटामधील गाणे खूप हिट झाले होते. या चित्रपटामध्ये आयुषनं चांगला अभिनय केला होता, मात्र तो प्रेक्षकांवर या चित्रपटाद्वारे जादू करू शकला नाही.

'लव्ह यात्री' चित्रपटाबद्दल : या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत वरीना हुसैन, रोनित रॉय, राम कपूर, प्रतीक गांधी, देसाई केनेथ आणि मनोज जोशी हे कलाकार दिसले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिराज मिनावाला यांनी केले होते. हा चित्रपट ५ ऑक्टोबर २०१८ रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये आयुष आणि वरीनाची केमिस्ट्री अनेकांना खूप आवडली होती. आयुष शर्मा लवकरच अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर चित्रपट 'एएस03' (AS03) मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची चर्चा बऱ्याचं दिवसांपासून सुरू आहेत. आयुषनं कमी चित्रपटांमध्ये काम केले असेल, पण त्यानं आपल्या उत्कृष्ट अभिनयाची छाप सोडली आहे.

हेही वाचा :

  1. IAS Abhishek Singh Album : माजी आयएएस अभिषेक सिंग सनी लिओनीसोबत करणार रोमान्स; व्हिडिओ व्हायरल...
  2. Asin Share pics and video : मुलगी अरिनच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करण्यासाठी असिननं एका वर्षानंतर इंस्टाग्रामवर केले पुनरागमन...
  3. Soni Razdan birthday : 'तू आमचं सर्वस्व आहेस', म्हणत आलिया भट्टनं दिल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.