ETV Bharat / entertainment

अर्जुन कपूर आणि मलायकाने घेतली शार्क टँक इंडियाचे जज अश्नीर ग्रोवरची भेट - शार्क टँक इंडियाचे जज अश्नीर ग्रोवर

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांची पॅरिसमध्ये शार्क टँक इंडिया टीव्ही शोचे प्रसिद्ध आणि वादग्रस्त जज अश्नीर ग्रोव्हर यांची भेट झाली. त्यानंतर सोशल मीडियावरील युजर्सनी यावर टीका केली आहे.

शार्क टँक इंडियाचे जज अश्नीर ग्रोवरची भेट

author img

By

Published : Jun 28, 2022, 12:24 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे लव्हबर्ड्स अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या फ्रान्समध्ये आहेत. त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे जोडपे येथे गेले होते. मलायकाने अर्जुनला त्याच्या ३७व्या वाढदिवसानिमित्त (२६ जून) पॅरिसला नेऊन ट्रीट दिली. वाढदिवस साजरा केल्यानंतर आता हे जोडपे तिथल्या सुंदर ठिकाणांचा आनंद लुटत आहेत आणि चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आहेत. पॅरिसमध्ये फिरताना या जोडप्याने शार्क टँक इंडिया टीव्ही शोचे प्रसिद्ध आणि वादग्रस्त जज अश्नीर ग्रोव्हर यांची भेट घेतली.

अर्जुन-मलायका यांचा UPI भारत पेचे माजी सीईओ अश्नीर ग्रोव्हर यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत मलायकाने हायलाइट कलरचा वन-पीस ड्रेस घातला आहे आणि अर्जुनने ब्लेझरखाली काळी पँट आणि निळा टी-शर्ट घातला आहे. तर अश्नीर डेनिम आणि स्वेट शर्टमध्ये आहे.

आता हा फोटो सोशल मीडियावर पसरताच यूजर्सनी तिघांनाही ट्रोल करायला सुरुवात केली. एका यूजरने अश्नीरचा 'ये क्या दोगलापन है' हा डायलॉग वारंवार लिहिला आहे. अर्जुन-मलायका लग्नासाठी गुंतवणूक करण्यासाठी भेटले असल्याचे एका यूजरने लिहिले आहे. अर्जुन कपूरबद्दल एका यूजरने असभ्य कमेंट केली आहे.

मलायका आणि अर्जुन 25 जूनपासून पॅरिसमध्ये वाढदिवस साजरा करत आहेत. या जोडप्याने सोशल मीडियावर पॅरिसमधील त्यांच्या प्रवासाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. या जोडप्याच्या चाहत्यांना हे फोटो आवडत आहेत आणि अनेकजण त्यांना ट्रोल देखील करत आहेत.

हेही वाचा - माधुरी दीक्षितने साजरा केला आईचा 90 वा वाढदिवस, दाखवले आई मुलीचे प्रेम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.