ETV Bharat / entertainment

Arijit Singh Gets Injured : लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायक अरिजित सिंग जखमी - महिला

गायक अरिजित सिंग अलीकडेच औरंगाबादमध्ये लाईव्ह कार्यक्रम सादर करताना एका चाहत्याने त्याच्या हाताला धक्का दिल्याने दुखापत झाली होती. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो चाहत्याला संयमाने राहण्याचे शिकवत असल्याच दिसत आहे.

Arijit Singh
अरिजित सिंग
author img

By

Published : May 9, 2023, 4:47 PM IST

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक अरिजित सिंग अलीकडेच औरंगाबादमध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान स्टेजवर असताना एका चाहत्याने त्याचा हात ओढल्याने तो जखमी झाला. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामध्ये गायक त्याच्या चाहत्याला संयमाने शिकवताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये अरिजित म्हणतो, जर मी परफॉर्म करू शकलो नाही, तर तुम्हाला मजा करता येणार नाही. हे इतके सोपे आहे. तुम्ही मला असे खेचत आहात. माझा हातात जोरात पकडत आहात. मी कार्यक्रम सोडून देऊ का? त्यानंतर तिथे आलेल चाहते ओरडले 'नाही'. तर नंतर महिलेने अरिजित सिंगला चुकून दुखावल्याबद्दल अनेक वेळा माफी मागितली.

लाइव्ह कॉन्सर्ट : अरिजित पुढे म्हणाला, तुला समजून घ्यावं लागेल. तुम्ही मोठे झाले आहेत. बरोबर? तू प्रौढ व्यक्ती आहेस ना? तू मला असं का ओढलंस? माझा हात आता सुध्दा थरथरत आहे. मी माझा हात हलवू शकत नाही आहे. हात खेचणारी महिलाने अरजितला म्हटले की तू माझ्या समोर होता त्यामुळे मी हात ओढला त्यानंतर अरजित म्हटले की सर्वां समोर येणार ना. मी इथल्या प्रत्येकावर प्रेम करतो .मी सगळ्यांकडे जाईल असे त्याने यावेळी म्हटले. अरिजितचे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले आहे. ज्यामध्ये अरिजित त्याच्या चाहत्यांनसोबत संवाद साधतांना दिसत आहे.

व्हिडिओ व्हायरल : सोशल मीडियावर व्हिडिओ समोर आल्यानंतर, चाहत्यांनी रेड हार्ट इमोटिकॉन्ससह टिप्पणी विभागात भरले आणि त्याने परिस्थिती कशी हाताळली याबद्दल त्याचे कौतुक केले आहे. अरजित सिंग अनेक गाण्यामुळे लोकप्रिय आहे. काही वेळा तो वेगवेळ्या ठिकाणी किंवा अवार्ड शोमध्ये, दिसतो. एकदा अरजित हा कपिल शर्मा शो मध्ये आला होता यावेळी त्याने तेथे आलेल्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. अरजितने अनेक गाणे ही बॉलिवूडमध्ये गायली आहेत. तुम ही हो, चन्ना मेरेया, प्यार होता क्या बार है, झूमे जो पठान, केसरिया ही गाणी त्यांनी गायली, त्यानंतर तो सर्वांचा पसंतीचा बनला.

हेही वाचा : Kerala Story Director Sudipto Sen : पश्चिम बंगालमधील द केरळ स्टोरीवरील बंदी 'राजकीयदृष्ट्या प्रेरित' दिग्दर्शक सुदीप्तो सेन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.