मुंबई - 'द काश्मीर फाइल्स' फेम ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांनी इफ्फी (भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव) ज्युरी प्रमुख नदव लॅपिड यांच्यावर टीकेचा निशाणा साधला. नदव लॅपिड यांचे भाष्य लज्जास्पद असल्याचे खेर यांनी म्हटलंय. इफ्फीच्या समरोप समारंभात ज्यरी प्रमुख नदव लॅपिड यांनी 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट प्रचारकी आणि चावट चित्रपट असल्याचे म्हटले होते.
28 नोव्हेंबर रोजी IFFI च्या समारोप समारंभाच्या वेळी लॅपिडने 'द काश्मीर फाइल्स' ला "प्रपोगंडा, व्हल्गर चित्रपट" असे संबोधले होते आणि इफ्फीसारख्या अशा प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धा विभागात हा चित्रपट पाहून आश्चर्य वाटल्याचेही ते म्हणाले होते.
"जर होलोकॉस्ट योग्य असेल तर काश्मिरी पंडितांचे पलायन देखील योग्य आहे. हे पूर्वनियोजित दिसते कारण त्यानंतर लगेचच टूल-किट टोळी सक्रिय झाली. ज्या ज्यूंना होलोकॉस्टचा त्रास सहन करावा लागला होता अशा एका समुदायातून ते आले असूनही असे विधान करणे त्यांच्यासाठी लज्जास्पद आहे.," अे अनुपम खेर यांनी मंगळवारी एएनआयला सांगितले.
"म्हणून असे विधान करून त्यांनी या शोकांतिकेचा सामना करणार्या लोकांनाही दुखावले आहे. मी एवढेच म्हणेन की देव त्यांना सद्बुद्धी देवो की त्यांनी हजारो लोकांच्या शोकांतिकेचा स्टेजवर आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी वापरू नये." असे खेर पुढे म्हणाले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
लॅपिडच्या टीकेचा संदर्भ देत अनुपम खेर यांनीही ट्विट केले की, "खोट्याची उंची कितीही उंच असली तरीही सत्याच्या तुलनेत ते नेहमीच लहान असते." ज्येष्ठ अभिनेत्याने आपल्या ट्विटसोबत 'द काश्मीर फाइल्स' आणि स्टीव्हन स्पीलबर्गच्या 'शिंडलर्स लिस्ट' चित्रपटातील फोटो जोडले आहेत.
एएनआयने 'काश्मीर फाइल्स' वरील ज्युरी प्रमुखांच्या विधानांवर महोत्सवाच्या आयोजकांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी टिप्पणी करण्यास नकार दिला.
या वर्षाच्या सुरुवातीला रिलीज झालेला, 'द काश्मीर फाइल्स' 2022 च्या IFFI च्या इंडियन पॅनोरमा सेगमेंटच्या लाइन-अपमध्ये सूचीबद्ध होता. हा चित्रपट काश्मीरच्या बंडखोरीदरम्यान 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित आहे. पहिल्या पिढीच्या व्हिडिओ मुलाखतींवर आधारित ही सत्यकथा आहे.