ETV Bharat / entertainment

Wedding Anniversary : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण, श्वेता बच्चनने दिल्या खास शुभेच्छा - श्वेता बच्चन

बॉलिवूडचे दिग्गज जोडपे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन त्यांच्या 'गोल्डन' लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत. तसेच वाढदिवसानिमित्त त्यांची मुलगी श्वेता बच्चनने तिच्या इंन्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे.

Wedding Anniversary
लग्नाचा वाढदिवस
author img

By

Published : Jun 3, 2023, 3:25 PM IST

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी वट पौर्णिमा देखील आहे. आज हे जोडपे त्यांच्या लग्नाचा ५०वा वाढदिवस साजरा करत आहेत. तसेच या वाढदिवसानिमित्त त्यांची मुलगी श्वेता बच्चन हिने इंन्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तिच्या आई आणि वडीलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. तिने इंस्टाग्रामवर जुने मोनोक्रोम फोटो शेअर करत लिहले, ' 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा., आता तुम्ही 'गोल्डन' आहात तुमच्या दीर्घ लग्नाचे रहस्य काय आहे असे विचारले असता, माझ्या आईने उत्तर दिले प्रेम, आणि बाबा म्हणाले होते ‘पत्नी ही नेहमीच योग्य असते’ असे तिने तिच्या पोस्टवर लिहले आहे. फोटोमध्ये जया बच्चन साडी नेसलेली दिसत आहे. याशिवाय ती फोटोमध्ये पतीकडे बघत हसत आहे. तर फोटोमध्ये अमिताभने पॅटर्न शर्ट आणि ट्राउझर्स घातलेले दिसत आहे.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण : श्वेता बच्चनच्या या पोस्टवर अनेक वापरकर्त्यांनी कमेंट केली आहे. या जोडप्याला त्यांच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त अभिनंदन करून एका चाहत्याने लिहिले, 'त्यांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा, माशाल्लाह त्यांचे आणखी 50 वर्षे एकत्र पुढे जावेत. तर दुसर्‍याने लिहिले, 'तुमच्या आई आणि वडिलांना 50व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा! तसेच आणखी एका चाहत्याने कमेंट केली की, 'ते एक हॉट जोडपे आहे! धन्य!!!!' तसेच या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी देखील शुभेच्छाचा वर्षाव केला आहे. झोया अख्तर, चंकी पांडे आणि अपूर्व मेहता यांच्यासह इतरांनी देखील त्यांना त्यांच्या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वर्कफ्रंट : दरम्यान अमिताभ वर्क फ्रंटवर बोलायचे झाले तर, ते लवकरच नाग अश्विनच्या प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहेत, ज्यात दीपिका पदुकोण आणि प्रभास देखील असणार आहेत, तसेच ते आगामी कोर्टरूम ड्रामा चित्रपट 'सेक्शन 84'मध्ये देखील झळकणार आहे. दुसरीकडे, जया बच्चन ही करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात शबाना आझमी, धर्मेंद्र, आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 28 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हेही वाचा :

  1. Neha singh rathore : लोकगायिका नेहा सिंह राठौरचा खास शैलीत महिला कुस्तीपटुंना पाठिंबा, गाण्यातून साधला केंद्र सरकारवर निशाणा
  2. Family dinner : करीना आणि करिश्मा कपूरने घेतला फॅमिलीसोबत डिनरचा आनंद
  3. Odisha train accident : सेलिब्रिटींनी ओडिशा ट्रेन अपघातावर व्यक्त केला शोक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.