मुंबई - अमित साध त्याच्या आगामी 'मैं' चित्रपटामध्ये पोलिसाची भूमिका साकारणार आहे. गेल्या वर्षी त्याने चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण केले होते. तेव्हापासून अमित त्याच्या इतर कामाच्या कमिटमेंट्स पूर्ण करण्यात गुंतला होता. गेल्या महिन्यात नवचैतन्य आणण्यासाठी ब्रेक घेतल्यानंतर, अभिनेता अमित साध सेटवर परतला आहे. त्याने मुंबईत 'मैं' चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग सुरू केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अमित साध सेटवर परतला - इंस्टाग्रामवर अमितने चित्रपटातील त्याचा लूक शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'कामावर परत!!! माझा आवडता फोटोग्रापर निखील नागझरकर यांनी काढलेले फोटो!!' चित्रपटाच्या सेटवर हा अमिता साध बंदूक घेऊन पोज देताना दिसला. निळ्या रंगाचा डेनिम शर्ट आणि काळ्या जीन्स परिधान केलेल्या अमितने त्याच्या काळ्या शेड्समध्ये आपला तोरा दाखवला. अभिनेत्री ईशा देओलने अमितच्या फोटोवर प्रतिक्रिया देत 'द अमित साध' अशी प्रतिक्रिया दिली. एका चाहत्याने त्याला द हँडसम कॉप म्हटले आहे.
मैंच्या कथानकावर अमित साध खूश - अमित साध 'मैं' चित्रपटामध्ये सीमा बिस्वास, तिग्मांशु धुलिया आणि मिलिंद गुणाजी यांसारख्या कलाकारांसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. नवोदित चित्रपट निर्माते सचिन सराफ यांनी सुरुवातीला चित्रपटाबद्दलचा त्याचा दृष्टीकोन कथन केला तेव्हा अमिता खूपच प्रभावित झाला होता. कॉप ड्रामा एका शक्तिशाली मेसेजसह सामाजिकदृष्ट्या प्रासंगिक असल्याचे म्हटले जाते. यापूर्वी अभिनेता अमिता साधने 'ब्रीद' मधील अपारंपरिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेने सर्वांनाच थक्क करून सोडले होते आणि आता तो पुन्हा एकदा पोलिस म्हणून त्याच्या अभिनयाने त्याच्या चाहत्यांना प्रभावित करण्यास उत्सुक आहे.
केल्याने देशाटन - भरपूर कष्ट करा आणि खूप प्रवास करा असे अमित साधचे म्हणणे असते. गेल्या काही महिन्यापासून तो रोज शुटिंगच्या कामात गुंतला होता. त्याने आपल्या या रोजच्या धबडग्यातून सुट्टी घेतली आणि आपल्या आवडत्या ठिकाणांची सैर केली. काही काळ स्वतःच्या शोधासाठी देत त्याने स्वित्झर्लंडमधील झुरिच आणि सेंट मॉर्टिज येथे शांत वेळ प्रवास केला आणि लंदनमध्ये निवांत वेळ घालवला. नवीन लोकांना भेटणे, विविध संस्कृतींचा अनुभव घेणे आणि जगभरातील नवीन ठिकाणांच्या सौंदर्याचा आस्वाद घेणे त्याला आवडते. अशा प्रकारे सुपर रिफ्रेश होऊन तो पुन्हा मैंच्या दुसऱ्या शेड्याूलसाठी परतला आहे.
हेही वाचा - वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरुन राजकारण तापले