मुंबई - Malaika Arjun together for marriage : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यात बिनसल्याचे आणि ते वेगळे झाल्याच्या बातम्या येत होत्या. सध्या मलायका अरोरा, फराह खान सोबत 'झलक दिखला जा' या शोची जज म्हणून काम करत आहे. एका एपिसोडमध्ये तिला तिचा पुनर्विवाह आणि सिंगल स्टेटसबद्दल विचारले असता तिने सकारात्मक संकेत दिले आहेत. तिचा माजी पती अरबाज खानने मेकअप आर्टिस्ट शशुरा खानसोबत लग्न केल्यानंतर लगेचच हे घडलं आहे. ब्रेकअपच्या वाढत्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर मलायका तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत तिची मैत्रिण करिश्मा करमचंदानीच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये दिसली.
अभिनेत्री सोनम कपूर, अर्जुनची बहीण अंशुला कपूर, चित्रपट निर्माती रिया कपूर आणि इम्रान खानची माजी पत्नी अवंतिका मलिक देखील या लग्न सोहळ्याला उपस्थित होत्या. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोत मलायका अरोरा, अर्जुन कपूर, स्वतः वधू आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर अर्पिता मेहता यांच्यासह झळकली आहे. दुसर्या फोटोमध्ये मलायका आणि अर्जुन त्यांचे मित्र कुणाल रावल, अर्पिता मेहता आणि अवंतिका मलिक यांच्यासोबत लग्नाचा आनंद लुटताना दिसत आहेत.
इंस्टाग्राम स्टोरीमध्ये मलायकाने वधू आणि वराचा एक फोटो शेअर केला. याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलंय, "अभिनंदन मिस्टर एन मिसेस... नेहमी प्रेममय आणि आनंद राहा." अंशुला कपूरने सोनम आणि रिया कपूरसोबत घालवलेले क्षण कॅप्चर करून इव्हेंटमधील फोटोंच्या स्ट्रिंगसह तिच्या फॉलोअर्सना ट्रीट दिली. फोटोत सोनमने लेहेंगा आणि दुपट्ट्याने पूरक असलेली बहु-रंगीत शॉर्ट कुर्ती परिधान केली आहे. अंशुलाने प्रिंटेड साडी नेसली होती, तर रियाने आकर्षक फुशिया-गुलाबी पारंपरिक वस्त्रांची निवड केली होती. अंशुला कपूरने फोटोंना "माईन" असे कॅप्शन दिले असून त्यासोबत लाल हार्ट इमोजी टाकला आहे.
मलायका आणि अर्जुन गेल्या काही काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या जोडप्याने 2019 मध्ये त्यांचे नाते सर्वांसमोर कबुल केले. अर्जुन कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तो अखेरचा अजय बहलच्या क्राइम थ्रिलर चित्रपट 'द लेडी किलर'मध्ये भूमि पेडणेकरसोबत दिसला होता. त्याच्या आगामी चित्रपटामध्ये 'मेरी पत्नी का रिमेक' आणि रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' या चित्रपटांचा समावेश आहे.
हेही वाचा -