मुंबई - अभिनेता अल्लू अर्जुनच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा: द रुल'चे सध्या शुटिंग सुरू आहे. दरम्यान त्याला आणखी एका दिग्गज यशस्वी दिग्दर्शकाचा चित्रपट मिळाला असून कबीर सिंग आणि अर्जुन रेड्डीचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या आगामी चित्रपटात अल्लु अर्जुन मुख्य भूमिका साकारणार आहे. आगामी प्रोजेक्टची निर्मिती भूषण कुमार यांच्या टी-सिरीज आणि भद्रकाली पिक्चर्सद्वारे केली जाणार आहे.
-
Brace yourselves for this massive collaboration between three powerhouses of India - Producer Bhushan Kumar, Director Sandeep Reddy Vanga and superstar Allu Arjun.@alluarjun @imvangasandeep #BhushanKumar #KrishanKumar @VangaPranay @VangaPictures #ShivChanana @NeerajKalyan_24 pic.twitter.com/xis8mWSGhl
— T-Series (@TSeries) March 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Brace yourselves for this massive collaboration between three powerhouses of India - Producer Bhushan Kumar, Director Sandeep Reddy Vanga and superstar Allu Arjun.@alluarjun @imvangasandeep #BhushanKumar #KrishanKumar @VangaPranay @VangaPictures #ShivChanana @NeerajKalyan_24 pic.twitter.com/xis8mWSGhl
— T-Series (@TSeries) March 3, 2023Brace yourselves for this massive collaboration between three powerhouses of India - Producer Bhushan Kumar, Director Sandeep Reddy Vanga and superstar Allu Arjun.@alluarjun @imvangasandeep #BhushanKumar #KrishanKumar @VangaPranay @VangaPictures #ShivChanana @NeerajKalyan_24 pic.twitter.com/xis8mWSGhl
— T-Series (@TSeries) March 3, 2023
निर्माता भूषण कुमार, प्रणय रेड्डी वंगा, सह-निर्माता शिव चनाना आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा आणि अल्लू अर्जुन यांनी अलीकडेच या मोठ्या चित्रपट कार्यला मूर्त रुप देण्यासाठी मिटींग केली. दिग्दर्शक संदीप वनगा यांच्या 'स्पिरिट' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर लगेचच ते या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करतील, ज्याची निर्मिती टी-सीरीज फिल्म्स प्रॉडक्शन करणार आहे. सुपरस्टार प्रभासची मुख्य भूमिका असलेला 'स्पिरिट' हा पॅन इंडिया चित्रपट हिंदी, तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड, जपानी, चायनीज आणि कोरियन यासह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
'भारतातील सर्वात मोठ्या सुपरस्टारसोबत 25 व्या चित्रपटाची घोषणा करणे ही जगभरातील त्याच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी असेल. प्रभास गारुसोबत काम करणे ही एक उत्कंठा वाढवणारी असेल आणि मला खात्री आहे की मी शूटिंग सुरू केल्यावर उत्साह दुप्पट होईल. सर्व काही मोठे आहे. या घोषणेबद्दल बोलायचे कारण म्हणजे भूषणजी हे आज देशातील सर्वात मोठे निर्माते आहेत. जे एक अतिशय मैत्रीपूर्ण आणि समजूतदार निर्माते देखील आहेत, ते सुद्धा एका भावासारखे आहेत. मी टी-सिरीज आणि भद्रकालीचा माझा भाऊ प्रणय रेड्डी वंगा यांच्याशी चित्रपटाशी जोडून खूप आनंदी झालो आहे.,' असे दिग्दर्शक संदीप वंगा म्हणाले.
दरम्यान, संदीप रेड्डी वंगा रणबीर कपूर, परिणीती चोप्रा, बॉबी देओल, अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'अॅनिमल' या क्राईम ड्रामाचे दिग्दर्शनही करत आहे. दुसरीकडे अल्लू अर्जुन सध्या रश्मिका मंदान्नासोबत 'पुष्पा: द रुल'चे शूटिंग करत आहे. 'पुष्पा: द राइज', हा सुकुमार दिग्दर्शित अॅक्शन एंटरटेनर चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाची सर्वत्र प्रशंसा झाली. फहद फासिल हा चित्रपटाच्या अखेरीस महत्त्वाचा भाग होता. पुष्पा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट म्हणून घोषित करण्यात आला होता आणि आता अल्लूचे चाहते चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पुष्पा: द रुल'ची अधिकृत रिलीज तारीख अद्याप प्रलंबित आहे.
हेही वाचा - Manoj Bajpayee On Nepotism : मनोज वाजपेयींनी नेपोटिझमवर बोलली एवढी मोठी गोष्ट; म्हणाले...