ETV Bharat / entertainment

Alia and Ranbir PDA moment : आलियाने घेतले रणबीरचे सार्वजनिकपणे चुंबन, व्हिडिओ व्हायरल - आलिया रणबीर हॅप्पी डे मुव्हमेंट

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर शुक्रवारी मुंबईतील त्यांच्या बांधकामाधीन घरात दिसले. या जोडप्याने त्यांच्या पहिल्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त बांधकाम साइटला भेट दिली. यावेळी पापाराझींनी त्यांना शुभेच्छा दिल्या व फोटोसाठी विनंती केली. त्यावेळी आलियाने त्याचे चुंबन घेतले. हा व्हिडिओ आणि फोटो आता व्हायरल झाले आहेत.

आलियाने घेतले रणबीरचे सार्वजनिकपणे चुंबन

author img

By

Published : Apr 15, 2023, 12:36 PM IST

मुंबई - त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त, अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट शुक्रवारी त्यांच्या मुंबईतील बांधकामाधीन घर पाहण्यासाठी बाहेर पडले. जेव्हा पापाराझींनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आणि फोटोची विनंती केली तेव्हा त्यांनी सार्वजनिकपणे पहिल्यांदाच चुंबन घेतले व त्यावेळी असंख्य कॅमेऱ्यांनी हे दृष्य कैद केले.

रणबीरचे आलियाने घेलेले चुंबन व्हायरल - सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये, आलिया रोमँटिक मुडमध्ये चुंबन घेताना दिसत आहे. रणबीर लग्नाच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणाऱ्यांना शेकहँड करताना दिसत आहे. यावेळी रणबीरने राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि पँट घातलेली होती आणि दुसरीकडे त्याची पत्नी पांढरा टी-शर्ट आणि काळी जीन्समध्ये होती. आलियाने तिचा लूक गोल्ड हूप इअररिंग्सने पूर्ण केला होता. गेल्या वर्षभरात लग्नानंतर त्यांची प्रत्येक मुव्हमेंट कॅमेऱ्यात बंद करण्याचा प्रयत्न पापाराझी करत असतात. आज त्यांनी जे दृष्य क्लिक केले ते त्यांना कायम स्वरुपी समाधान देणारे असेच होते.

आलिया रणबीर हॅप्पी डे मुव्हमेंट - आदल्या दिवशी, आलियाने इंस्टाग्रामवर तिच्या आयुष्यातील प्रेमाने रणबीरसोबत घालवलेले तिचे खास क्षण शेअर केले. तिने तीन आनंददायी फोटो टाकले. जोडप्याच्या हळदी समारंभ, केनियातील प्रपोज आणि अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या एंगेजमेंट पार्टीतील फोटो शेअर करत तिने त्याला हॅप्पी डे असे कॅप्शन दिले. हे स्टार डोडपे जिथेही हजर राहते तिथे सर्वांच्या नजरा खेचून घेते.

एक वर्षाच्या संसारात लेकीची आगमन - आलिया आणि रणबीर त्यांच्या हिट चित्रपट ब्रह्मास्त्रच्या शूटिंगदरम्यान प्रेमात पडले. काही वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधली. रणबीरच्या मुंबईतील निवासस्थानी कुटुंब आणि जवळच्या मित्रांमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. खास दिवसासाठी, हे दोघे हस्तिदंती मॅचिंग कपड्यामध्ये सजले होते. त्यांची मुलगी राहा हिच्या आगमनाने २०२२ हे वर्ष दोघांसाठी आणखी खास बनले. या जोडप्याने अद्याप राहाचा चेहरा उघड केलेला नाही.

हेही वाचा - Katrina Kaif And Vicky Kaushal Spotted : कॅटरिना कैफ आणि विकी कौशल बऱ्याच दिवसांनी दिसले एकत्र, विमानतळावर चाहत्यांची गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.