ETV Bharat / entertainment

आलिया भट्टनं 2023 वर्षातील कामगिरीचा व्हिडिओ केला शेअर - अभिनेत्री आलिया भट्ट

Alia Bhatt 2023 Wrap: अभिनेत्री आलिया भट्टनं एक सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये 2023 मधील तिनं केलेल्या तिच्या सर्व घडामोडी आहेत.

Alia Bhatt 2023
आलिया भट्ट २०२३
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 31, 2023, 10:47 AM IST

मुंबई : Alia Bhatt 2023 Wrap: अभिनेत्री आलिया भट्टनं अलीकडेच सोशल मीडियावर एक रिल शेअर केली आहे. मुलगी राहाच्या जन्मापासून ते राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्यापर्यंत, आलिया भट्टचे 2023 खूप चांगले होते. आलिया शेवटी करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात रणवीर सिंगसोबत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला होता. या चित्रपटामधील गाणी ही खूप सुंदर होती. 2023 वर्षात आलियानं मेट गालामध्ये पदार्पण केलं.

आलिया भट्टचं 2023 चं वर्ष : आलियानं पांढर्‍या गाऊनमध्ये सुंदरपणे रेड कार्पेटवर वॉक केला. तिचा याचं वर्षी पहिली हॉलिवूड चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन' हा रिलीज झाला. याशिवाय आलिया ही आंतरराष्ट्रीय स्तरावर फॅशन शोमध्ये देखील दिसली होती. आलियानं शेअर केलेल्या या रिलमध्ये तिनं या वर्षाचा सारांश दिला आहे. या रिलमध्ये तिच्या या वर्षातील अनेक लुक्सचा समावेश आहे. आलियाला 'गंगूबाई काठियावाडी'साठी या वर्षीचा पहिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' नंतर आलिया भट्ट पुढील वर्षी सप्टेंबर 2024 मध्ये 'जिगरा' चित्रपटामध्ये दिसणार आहे. तिनं करण जोहरसोबत या चित्रपटाची सहनिर्मितीही केली आहे.

'जिगरा'मध्ये दिसेल आलिया : सध्या आलिया 'जिगरा' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वासन बाला यांनी केलं आहे. आलियानं एका चिठ्ठीसह जाहीर केले होतं, की तिच्या आयुष्यातील एक अतिशय खास क्षण आला आहे. यामध्ये तिनं सांगितलं होतं, 'अत्यंत प्रतिभावान वासन बाला दिग्दर्शित आणि धर्ममोव्हीज निर्मित 'जिगरा' हा लवकरच येणार आहे. धर्मा प्रॉडक्शनमध्ये पदार्पण करण्यापासून ते करणसोबत चित्रपटाची निर्मिती करण्यापर्यंत, प्रत्येक दिवस हा वेगळा दिवस मला .. रोमांचक आणि आव्हानात्मक वाटत आहे. 'जिगरा' सप्टेंबर 2024 मध्ये रिलीज होणार आहे, असं तिनं पोस्टमध्ये सांगितलं होतं. आलियाचे चाहते तिच्या या आगामी चित्रपटाची वाट आतुरतेनं पाहत आहेत.

हेही वाचा :

  1. महेश बाबू दुबईत पत्नी नम्रता शिरोडकर आणि मुलांसोबत करणार नवीन वर्ष साजरे
  2. अमिताभ बच्चन यांनी वॉर्नर म्युझिक इंडिया कंपनीला पाच वर्षांसाठी भाड्यानं दिली 'ही' मालमत्ता
  3. सेन्सॉर बोर्डानं 'ए' प्रमाणपत्र दिल्यानंतर 'या' चित्रपटांनी केली बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.