मुंबई - घर बंदूक बिरयानी या चित्रपटामधील धमाकेदार आहा हिरो हे गाणे रिलीज झाले आहे. अभिनेता आकाश ठोसर आणि सयाजी शिंदे यांच्यासह साथीदारांवर चित्रीत झालेले हे गाणे चित्रपटाची वेगळी झलक दाखवणारे आहे. अपेक्षितांनी हातात बंदुक घेऊन केलेल्या उठावाची गोष्ट या गाण्यात मांडण्यात आली आहे. आतापर्यंतच्या गाण्यातील हा एक वेगळा फॉर्म या गाण्यातून स्पष्ट दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
घर बंदुक बिरयानी या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. यात सयाजी शिंदेचा एक नवा अवतार पाहायला मिळत आहे. आम्हाला काय दिले, असे म्हणत सयाजीची आक्रमकपणे आकाश ठोसरला जवाब विचारताना गाण्यात दिसत आहे. आहा हिरो हे वेगळ्या धाटणीचे गाणे प्रसिध्द बॉलिवूड सिने कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी सेट केले आहे. यात त्यांच्या हुकमी सिग्नेचर स्टेप्स पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे नागराज मंजुळेंच्या चित्रपटात यापूर्वी वेगळी कोरिओग्राफी पाहायला मिळत नव्हती. पण पहिल्यांदाच या धमाकेदार गाण्यासाठी त्यांनी गणेश आचार्यंचा वापर केला आहे.
आहा हिरो हे गाणे वैभव देशमुख यांनी लिहिले असून प्रविण कुमार यांनी गायले आहे. या गाण्यात कोरसमध्ये विवेक नाईक, राहुल चिटणीस, संतोष बोटे, मंगेश शिर्के यांचा आवाज ऐकू येतो. शिवाय सयाजीनेही काही ठिकाणी आपला ओरिजनल आवाज दिला आहे. हे धमाकेदार गाण्यामुळे चित्रपट एक नवा धमाका करण्यासाठी सज्ज झालाय याची प्रचिती मिळते. गीताबाबत संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी हे गाणे कंपोज केले आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या 'घर- बंदूक- बिरयानी' या चित्रपटाचा टिझर प्रसिध्द झाल्यापासून चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढीस लागली होती. हा चित्रपटा झी स्टुडिओज आणि नागराजची संयुक्त निर्मिती असणार आहे. या चित्रपटाचे संगीतकार आहेत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी सर्व गीतांना चाली दिल्या आहेत. यापूर्वी गुन गुन हे गाणेही लोकप्रिय ठरले होते.
हा चित्रपट पॅन इंडिया चित्रपट असून मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगु या चार भाषेत रिलीज होणार आहे.
हेही वाचा - Hca Breaks Silence On Jr Ntr : हॉलिवूड क्रिटिक्स पुरस्कारास ज्युनियर Ntr गैरहजर, Hca ने केला खुलासा