ETV Bharat / entertainment

Adipurush Free Tickets : आदिपुरुष या चित्रपटाची तिकिटे मोफत वाटली जाणार ; पण कुठे ते घ्या जाणून

author img

By

Published : Jun 8, 2023, 4:45 PM IST

Updated : Jun 8, 2023, 7:11 PM IST

आदिपुरुष या चित्रपटाचे मोफत तिकिटे तेलंगणामध्ये वाटली जाणार आहे. ही तिकिटे तेलंगणामधील सरकारी शाळा, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमातील लोकांना मोफत देण्यात येणार आहेत.

Adipurush Free Tickets
आदिपुरुष मोफत तिकिटे

मुंबई: साऊथ सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन स्टारर बहुप्रतिक्षित चित्रपट आदिपुरुष १६ जून रोजी प्रदर्शित होत आहे. आदिपुरुषच्या रिलीजबाबत प्रभासच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. नुकताच तिरुपती येथे चित्रपटाचा प्री-रिलीज इव्हेंट पार पडला या चित्रपटाबाबत हीच क्रेझ यावेळी देखील पाहायला मिळाली होती. आदिपुरुषची संपूर्ण टीम या कार्यक्रमाला उपस्थित होती आणि प्रभास-क्रितीने आदिपुरुष चित्रपटाचा अंतिम ट्रेलर लॉन्च केला. तसेच आता आदिपुरुषच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.आदिपुरुष चित्रपटासाठी मोफत सिनेमा तिकीट वाटण्यात येणार आहे. हा चित्रपट पाच भाषांमध्ये (हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड) प्रदर्शित होणार आहे.

  • #Adipurush is a once in a lifetime movie which needs to be celebrated by one and all.

    Out of my devotion for Lord Shree Ram, I have decided to give 10,000+ tickets to the Government schools, Orphanages & Old Age Homes across Telangana for free.

    Fill the Google form with your… pic.twitter.com/1PbqpW9Eh6

    — Abhishek Agarwal 🇮🇳 (@AbhishekOfficl) June 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

#Adipurush is a once in a lifetime movie which needs to be celebrated by one and all.

Out of my devotion for Lord Shree Ram, I have decided to give 10,000+ tickets to the Government schools, Orphanages & Old Age Homes across Telangana for free.

Fill the Google form with your… pic.twitter.com/1PbqpW9Eh6

— Abhishek Agarwal 🇮🇳 (@AbhishekOfficl) June 7, 2023

मोफत तिकीट कुठे मिळेल? : 500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या आदिपुरुष या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केली जात आहे. आता या चित्रपटाची मोफत तिकिटे वाटली जाणार आहेत. 'द काश्मीर फाइल्स' आणि 'कार्तिकेय-2'चे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी घोषणा केली आहे की, ते संपूर्ण तेलंगणामध्ये आदिपुरुष चित्रपटाची दहा हजार मोफत तिकिटे वाटणार. याशिवाय त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये याबद्दल माहिती देत लिहले, 'श्री राम यांच्याप्रती असलेल्या श्रद्धेमुळे मी आदिपुरुष या चित्रपटाची १० हजार तिकिटे मोफत वाटण्यचा निर्णय घेतला आहे. ही तिकिटे तेलंगणामधील सरकारी शाळा, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमातील लोकांना देण्यात येतील,' असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्याबरोबरच त्यांनी मोफत तिकिटासाठी गुगल फॉर्मची लिंक देखील ट्वीटवर शेअर केली आहे.

आदिपुरुष स्टारकास्ट : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने राघवची भूमिका साकारली आहे. तर क्रिती सेनॉन जानकीची भूमिका साकरली आहे. सैफ अली खान हा लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच सनी सिंग हा लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे . या चित्रपटाची वाट प्रेक्षक फार आतुरतेने पाहत आहे. कारण आदिपुरुष हा चित्रपट महाकाव्य रामायणाची आधुनिक आवृत्ती आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षक फार आवडीने पाहणार हे दिसत आहे. कारण या चित्रपटाच्या गाण्यालाही फार जास्त प्रेक्षकांद्वारे पसंत केल्या गेले आहे.

हेही वाचा :

  1. Om Raut criticized : आदिपुरुष दिग्दर्शक ओम राऊतने तिरुपती मंदिरात क्रिती सेनॉनचे चुंबन घेतल्याने वाद
  2. ZHZB Collection Day 6 : 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या कमाईवर सर्वांचे लक्ष...
  3. The Broken News season 2 : द ब्रोकन न्यूज सीझन २ चा टीझर रिलीज, माध्यमांचे पितळ उघडं पाडणारा थ्रिलर

Last Updated : Jun 8, 2023, 7:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.