ETV Bharat / entertainment

ADIPURUSH BOX OFFICE COLLECTION : आदिपुरुष या चित्रपटाची कमाई धोक्यात - बॉक्स ऑफिस कलेक्शन

प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन स्टारर चित्रपट आदिपुरुष हा कमाईच्याबाबती धोक्यात आला आहे. या चित्रपटाच्या कलेक्शनात पहिल्या सोमवारपासून सातत्याने घट होत आहे. त्यामुळे रूपेरी पडद्यावर या चित्रपटाचा लवकरच टाटा बाय बाय होणार असे दिसत आहे.

ADIPURUSH BOX OFFICE COLLECTION
आदिपुरुष बॉक्स ऑफिस कलेक्शन
author img

By

Published : Jun 30, 2023, 1:46 PM IST

मुंबई : प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन स्टारर आदिपुरुष या चित्रपटला बॉक्स ऑफिसवर सतत संघर्ष करावा लागत आहे. चित्रपटाच्या कलेक्शनात पहिल्या सोमवारपासून सातत्याने घट होत आहे मात्र आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाने थोडी कमाई केली होती, पण गुरुवारी, कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर 'सत्यप्रेम की कथा रिलीज झाल्यानंतर', आदिपुरुष या चित्रपटाने 1 कोटीच्या खाली कमाई केली आहे. आदिपुरुष हा चित्रपट कमाईच्याबाबत सध्याला धोक्यात आहे. आदिपुरुषने 29 जून रोजी दोन आठवडे पूर्ण केले आहेत आणि आता रिलीजच्या 15 व्या दिवसात हा चित्रपट सुरू आहे. या चित्रपटाने 14 व्या दिवशी फारच कमी कमाई केली आहे. आता या चित्रपटाला तिसरा आठवडा खेचणे कठीण जाणार आहे. चित्रपटाची एकूण कमाई 450 कोटींच्या पुढे गेली असली तरी 'सत्यप्रेम की कथा प्रदर्शित होताच आदिपुरुषचे कलेक्शन 1 कोटींच्या खाली गेले आहे. 14 व्या दिवशी आदिपुरुषांनी किती कमाई केली ते जाणून घेऊया.

14 व्या दिवशी आदिपुरुषाने किती कमाई केली : आदिपुरुष या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फार जास्त सतत संघर्ष करावा लागत आहे. चित्रपटाने 14 व्या दिवशी एक कोटीपेक्षा कमी कमाई केली आहे. आदिपुरुषने 14 व्या दिवशी 90 लाख (अंदाजित) कमावले आहेत, देशांतर्गत या चित्रपटाला 300 कोटींचा आकडा गाठणे फार कठीण जात आहे. दरम्यान देशांतर्गत चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाचे एकूण कलेक्शन 281.98 कोटी रुपयांवर गेले आहे आणि आता या चित्रपटासाठी 300 कोटींची कमाई करणे कठीण जाणार आहे.

'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाने आदिपुरुषाचा केला नाश : आदिपुरुषला आधीच देशभरात विरोध होत होता, त्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर फार मोठा परिणाम झाला होता. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा 'सत्यप्रेम की कथा' प्रदर्शित झाल्याने आता हा चित्रपट कमाईच्या बाबतीत मागे पडत आहे. 'सत्यप्रेम की कथा' 29 जून रोजी रिलीज झाली आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाने 9 कोटी (अंदाजे) कमावले आहे. 'सत्यप्रेम की कथा' रिलीज झाल्यामुळे आदिपुरुष आणि जरा हटके जरा बच्चे या चित्रपटांना कमाई करणे बॉक्स ऑफिसवर कठीण होणार आहे.

हेही वाचा :

  1. ZHZB BOX OFFICE COLLECTION DAY 28 : 'जरा हटके जरा बचके'ने 28 व्या दिवशी केली एक कोटींपेक्षा कमी कमाई
  2. naming ceremony : पाहा, राम चरण आणि उपासनाच्या मुलीच्या बारशाची जय्यत तयारी
  3. Lust Stories 2 : लस्ट स्टोरीज 2 स्टार तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी शेअर केला त्यांच्या डेटिंग अनुभवाबद्दलचाा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.