ETV Bharat / entertainment

Adipurush box office collection day 13 : बॉक्स ऑफिसवर 'आदिपुरुष' कोसळला - कार्तिक आर्यन

बॉक्स ऑफिसवर दोन आठवडे पूर्ण होण्याआधीच आदिपुरुष व्हेंटिलेटरवर आला आहे. सध्याला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार संघर्ष करत आहे. 13 व्या दिवसाच्या कमाईवरून असे दिसून येते की आदिपुरुषाचा आता अंत निश्चित आहे.

Adipurush box office collection day 13
आदिपुरुष बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १३
author img

By

Published : Jun 29, 2023, 1:55 PM IST

मुंबई : साऊथ सुपरस्टार प्रभास आणि क्रिती सेनॉन स्टारर 'आदिपुरुष' चित्रपट बॉक्स ऑफिसवर घसरणीकडे वाटचाल करत आहे. हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित झाला होता आणि आता 29 जून रोजी रिलीजच्या 14 व्या दिवसात प्रवेश करत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमी प्रमाणात कमाई करत आहे. चित्रपट हळूहळू संपत आहे. आता 13व्या दिवसाच्या कमाईने हे देखील समोर आले आहे की, हा चित्रपट लवकरच रूपेरी पडद्यावरून परत जाईल. या चित्रपटाबाबत असे म्हटले जात आहे की आता स्वतः भगवान राम देखील आदिपुरुष या चित्रपटाला वाचवू शकणार नाहीत. या 13 दिवसात आदिपुरुषचे देशांतर्गत आणि जगभरात एकूण कलेक्शन किती होते आणि 13व्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली. चला जाणून घेऊया.

आदिपुरुषाची तेराव्या दिवसाची कमाई : देशभरात चौफेर विरोध होत असलेला आदिपुरुष हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत बॉक्स ऑफिसवर टिकू शकणार नाही असे दिसत आहे. कारण दोन आठवडे पूर्ण होण्यापूर्वीच चित्रपटाचा अंत झाला असून चित्रपटाच्या 13व्या दिवसाच्या कमाईवरून चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काळ टिकणार नसल्याचे दिसून येत आहे. 13व्या दिवशी चित्रपटाची अंदाजे कमाई 1.50 कोटी रुपये आहे. यासह, देशांतर्गत चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाचे कलेक्शन 281.04 कोटींवर गेले आहे आणि चित्रपटाने जगभरात सुमारे 455 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 28 जून रोजी थिएटरमध्ये 7.78 ऑक्यूपेंसी नोंद झाली आहे. त्यामुळे हा चित्रपट रूपेरी पडद्यावर आपला जादू दाखवू शकला नाही. या चित्रपटाला आता देखील फार विरोध होत आहे. सोशल मीडियावर आता देखील मिम्सद्वारे चित्रपटाची छेड काढली जात आहे. तसेच आता देखील प्रेक्षक या चित्रपटाच्या निर्मात्यांना शिव्या देत आहे.

सत्यप्रेमाच्या कथेने आदिपुरुषाची कथा संपेल : आता 29 जूनला आदिपुरुष रिलीज होऊन दोन आठवडे पूर्ण करणार आहेत, पण 29 जूनला कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी या हिट जोडीचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता आदिपुरुषांना चिल्लरही मिळवणे कठीण होईल.

हेही वाचा :

  1. Leo Movie : 'लिओ' चित्रपटातील विजयचे 'ना रेड्डी' गाणे वादात अडकले
  2. SPKK Movie : 'सत्यप्रेम की कथा' आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित, 'भूल भुलैया 2' चा रेकॉर्ड तोडू शकेल ?
  3. Afalathoon release date : आंधळा, मुका आणि बहिऱ्या मित्रांची अतरंगी धमाल चित्रपट ‘अफलातून’!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.