मुंबई - हल्लीच मानसी नाईकने आपले पती प्रदीप खरेरा सोबत काडीमोड घेतला. अर्थातच घटस्फोट ही एक मन खच्ची करणारी गोष्ट आहे, हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट आहे. परंतु मानसी नाईक खंबीरपणे म्हणतेय, 'दिल टूटा है तो क्या’. खरंतर मानसीचा एक म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला आहे त्याचे हे टायटल आहे. परंतु ते शीर्षक तिच्या आयुष्यातील घटनांशी सांगड घालणारे आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
सोशल मीडियावर डान्स आणि एक्सप्रेशन क्वीन म्हणून ओळखली जाणारी मराठी स्टार अभिनेत्री मानसी नाईक हिचा पहिला हिंदी म्युझिक व्हिडिओ नुकताच रिलीज करण्यात आला आहे. स्वरूप भालवणकर यांनी संगीतबद्ध केलेले आणि त्यांच्याच आवाजात गायलेले, सीजीपी म्युझिक इंडियाने प्रसिद्ध केलेल्या ‘दिल टूटा है तो क्या’ या गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
![ब्रेकअप म्युझिक व्हिडिओ मुंबईतील एका कार्यक्रमात लॉन्च करण्यात आला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-mansi-naik-diltutahaitokya-mhc10001_16022023155159_1602f_1676542919_717.jpg)
ब्रेकअप म्युझिक व्हिडिओ मुंबईतील एका कार्यक्रमात लॉन्च करण्यात आला ज्यामध्ये मानसी नाईक, सूरज सूरकर, स्वरूप भालवणकर आणि व्हिडिओ दिग्दर्शक रवी शर्मा उपस्थित होते. निर्माता अझहर अली शेख यांचा हा व्हिडिओ सीजीपी म्युझिक इंडिया आणि चेतन गरुड प्रॉडक्शनने सादर केला आहे. व्हिडिओमध्ये मानसी सोबत सूरज दिसत आहे, तर गायक स्वरूप भालवणकर ही व्हिडिओमध्ये दिसत आहे. हृदयस्पर्शी गाण्याचे बोल रवी शर्मा यांनी लिहिले आहेत.
![मानसी नाईक, सूरज सूरकर, स्वरूप भालवणकर आणि व्हिडिओ दिग्दर्शक रवी शर्मा उपस्थित होते](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-mansi-naik-diltutahaitokya-mhc10001_16022023155159_1602f_1676542919_92.jpg)
मानसी नाईक यांनी सांगितले की, 'या व्हिडिओसोबत एक सुंदर कथा जोडलेली आहे. या म्युझिक व्हिडिओद्वारे एक भावनिक कथा सुंदरपणे सांगितली आहे. ही एक वेगळी कथा आहे, परंतु व्हिडिओच्या शेवटी, जीवनात किंवा नातेसंबंधात जे काही घडते ते चांगल्यासाठीच होते असा थेट संदेश देण्यात आला आहे. आशा आणि सकारात्मक विचार नेहमी ठेवा, कधीही हार मानू नका.'
![ब्रेकअप म्युझिक व्हिडिओ मुंबईतील एका कार्यक्रमात लॉन्च करण्यात](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-mansi-naik-diltutahaitokya-mhc10001_16022023155159_1602f_1676542919_403.jpg)
स्वरूपने सांगितले की, 'जेव्हा या गाण्याचे बोल माझ्याकडे आले, तेव्हा एक रचना बनवली गेली, मग त्याचा व्हिडीओही एक कल्पना मनात ठेवून गाणे तयार केले. हा व्हिडिओ खरं तर खूप सुंदर संदेश देतो की माणसाने आयुष्यात प्रत्येक परिस्थितीत पुढे जावे.' अभिनेता सूरज पुढे म्हणाला की, 'हा माझा पहिलाच प्रकल्प असून मानसीसारख्या स्टार सोबत काम करणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.'
व्हिडिओ दिग्दर्शक रवी शर्मा यांनी सांगितले की, 'स्वरूप भालवणकर यांनी हा व्हिडीओ बनवण्यात खूप सहकार्य केले आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून आम्ही समाजाला हा संदेश देऊ इच्छितो की, आयुष्यात जे काही घडले आहे ते पुढे जाणे चांगले आहे.'
हेही वाचा - Plagiarism Row: केरळ हायकोर्टाने कंतारातील गाण्यासाठी पृथ्वीराज सुकुमारन विरुद्धच्या एफआयआरला दिली स्थगिती