ETV Bharat / entertainment

Sonnalli Seygall wedding : गुपचूप लग्न करून अभिनेत्री सोनली सेगल अडकली लग्नबंधनात - सोनली सेगल अडकली लग्नबंधनात

प्यार का पंचनामा फेम सोनली सेगलने बुधवारी आशिष सजनानीसोबत लग्नगाठ बांधली. या जोडप्याने मुंबईत गुरुद्वारामध्ये लग्न केले. या विवाह सोहळात तिचे कुटुंब आणि मित्रपरिवार उपस्थित होते.

Sonnalli Seygall wedding
सोनली सेगल लग्न
author img

By

Published : Jun 8, 2023, 10:51 AM IST

मुंबई : ‘प्यार का पंचनामा २’ चित्रपटातून प्रसिद्धी झोतात आलेली सोनाली सेगल सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आलेली आहे. सोनालीने ७ जून रोजी बॉयफ्रेंड आशिष सजनानीसोबत लग्नगाठ बांधली. सोनालीने गुपचूप लग्न करून तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. सोनाली सेगल गेल्या ५-६ वर्षांपासून आशिष सजनानीसोबत रिलेशनशिपमध्ये होती, मात्र दोघांनी कधीच त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे सांगितले नाही. या जोडप्याने मुंबईतील सांताक्रूझ वेस्ट परिसरातील गुरुद्वारामध्ये लग्न केले.

सोनालीच्या लग्नात मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. मे महिन्यात त्यांनी नातेवाइकांसह पारंपरिक रोका समारंभ आयोजित केला होता. तसेच सोनालीने लग्नात मनीष मल्होत्रा ​​डिझाईन केलेली साडी परिधान केली होती. या साडीत ती फार देखणी दिसत होती. तिने साडीवर चांदीचे कानातले आणि चांदीचे हिऱ्याने मडविले दागिणे घातले होते. या गुलाबी रंगाच्या ती वेशभूशेत ती फार सुंदर दिसत होती. याशिवाय तिने गुलाबी रंगाचा पोशाख घातलेला एक कुत्राही सोबत घेतला होता. दरम्यान दुसरीकडे, आशिषने वधूच्या ड्रेसशी जुळण्यासाठी कुणाल रावलने डिझाईन केलेली ऑफ-व्हाइट शेरवानी घातली होती. दरम्यान आशिष बोलायचे झाले तर तो हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक आहे. यााशिवाय त्याचा ओपा नावाची स्वतःची हॉस्पिटॅलिटी फर्म आहे.

सोनालीची इच्छा : तसेच आयुष्यातील नवीन अध्यायाबद्दल बोलताना सोनाली म्हटले, आशिष आणि मी एका गोष्टीबद्दल अगदी स्पष्ट होतो, ते म्हणजे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण लोकांसोबत एक अतिशय साधे लग्न.' आमच्यासाठी हा एक अतिशय वैयक्तिक प्रसंग असल्याने, आम्ही आमचे लग्न गुरुद्वारामध्ये करण्याचे ठरवले. आमच्या दोन्ही आईनाही हेच हवे होते आणि आम्ही त्यांची इच्छा पूर्ण करू शकलो याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. मी माझे नवी जीवन सुरू करण्यास उत्सुक आहे. 'आमच्या एकत्र आयुष्यातील हा एक नवीन अध्याय आहे,' असे तिने सांगितले.

इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स लग्नात उपस्थित : सोनाली पक्की गुरबानी या गाण्याने लग्नात एन्ट्री केली होती. याशिवाय लग्नाची सजावट ही गुलाबी आणि हिरव्या रंगात ठेवली होती. सोनाली सेगलच्या लग्नाला इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. चाहत खन्ना, मंदिरा बेदी, रिद्धिमा पंडित, सुमोना चक्रवर्ती आणि टीव्ही अभिनेता करण व्ही ग्रोव्हर देखील आपल्या पत्नींसोबत या लग्नात उपस्थित होता. याशिवाय कार्तिक आर्यननेही सोनालीच्या लग्नाला हजेरी लावली.

हेही वाचा :

  1. Sonnalli seygall wedding : 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सेगलने गुपचूप लग्न केले
  2. Sharwanand's wedding : श्रावाणानंदच्या लग्नात सिद्धार्थने ओये ओये गाताना प्रेक्षकांना केले आश्चर्यचकित
  3. Citadel action training in Serbia : वरुण धवन आणि सिकंदर खेर सिटाडेलसाठी सर्बियामध्ये घेतायत कठोर प्रशिक्षण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.