ETV Bharat / entertainment

लाल सिंग चड्ढाच्या अपयशामुळे रखडला आमिर खानचा गुलशन कुमार बायोपिक मोगल

लाल सिंग चड्ढा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्याने अमीर खानच्या आगामी चित्रपटांच्या भविष्यावर परिणाम झाला आहे. बातम्यांवर विश्वास ठेवला तर त्याचा मोगल हा बहुप्रतिक्षित चित्रपट रद्द करण्यात आला आहे. सुभाष कपूर दिग्दर्शित मोगुल हा चित्रपट गुलशन कुमार यांचा बायोपिक आहे. या चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवातीपासूनच अडथळे आले आहे.

गुलशन कुमार बायोपिक मोगल
गुलशन कुमार बायोपिक मोगल
author img

By

Published : Aug 26, 2022, 4:03 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानची मुख्य भूमिका असलेला लाल सिंग चड्ढा 11 ऑगस्ट रोजी रिलीज झाल्यावर दुर्दैवाने बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली होती. आमिर खान आगामी गुलशन कुमारचा बायोपिक मोगल हा चित्रपट करणार होता. मात्र लाल सिंग चड्ढा चित्रपटाच्या पराभवानंतर हा चित्रपट मागे पडल्याचे सांगितले जात आहे.

ताज्या माहितीनुसार लाल सिंग चड्ढाला बॉक्स ऑफिसवर अपयश आल्याने अमीरच्या आगामी चित्रपटांच्या भविष्यावर परिणाम झाला आहे. बातम्यांवर विश्वास ठेवला तर मोगलच्या निर्मात्यांनी मोगल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांनी अद्याप मोगलला स्थगिती दिली आहे की आमिरसोबतचा त्यांचा करार अद्याप कायम आहे हे जाहीर केलेले नाही.

यापूर्वी दिग्दर्शक सुभाष कपूर लैंगिक छळाच्या प्रकरणात अडकल्यानंतर आमिरने चित्रपट सोडला होता. 2019 मध्ये त्याने आपला निर्णय मागे घेतला आणि पडद्यावर गुलशन कुमारची भूमिका साकारण्यास होकार दिला होता. मोगल चित्रपटाला सुरुवातीपासूनच अनेक अडथळ्यांचा समाना करावा लागला होता. निर्मात्यांनी याआधी अक्षय कुमारला गुलशन कुमार बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेसाठी राजी केले होते परंतु काही मतभेदांमुळे तो या प्रकल्पातून बाहेर पडला.

सुपर कॅसेट इंडस्ट्रीजचे संस्थापक असलेल्या चित्रपट निर्माते गुलशन कुमार यांना म्यूझिक इंडस्ट्रीचा मोगल समजले जाते. 12 ऑगस्ट 1997 रोजी त्यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यानंतर त्यांची चित्रपट निर्मिती व कसेट कंपनीची धुरा त्यांचा मुलगा भूषण कुमार यांनी यशस्वी चालवली आहे. त्यांच्यावर बायोपिक निर्माण करण्याचे स्वप्न भूषण कुमार यांनी बाळगले आहे. मोगल या वर्षाच्या सुरुवातीला फ्लोरवर जाणार होता आणि 2023 मध्ये थिएटरमध्ये येणार होता. मोगलला स्थगिती दिल्याच्या बातमीमुळे चित्रपट पुन्हा अनिश्चिततेच्या गर्तेत अडकल्याचे दिसते.

हेही वाचा - Cobra Trailer Release विक्रमचे अनेक अवतार पाहताना प्रेक्षक थक्क

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.