Aamir Ranbir New Film : आमिर खान आणि रणबीर कपूर दिसणार नवीन चित्रपटात - aamir khan
'लाल सिंह चड्ढा' नंतर आमिर खान त्याच्या नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहे. आमिरच्या या नव्या प्रोजेक्टमध्ये त्याच्यासोबत रणबीर कपूर दिसणार आहे. आमिर आणि रणबीर एका चित्रपटात एकत्र दिसण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी रणबीर कपूर आमिर खानचा सुपरहिट चित्रपट 'पीके' (2014) मध्ये छोट्या भूमिकेत दिसला होता.

हैदराबाद : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान सध्या त्याच्या आगामी 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. आमिर खान आणि रणबीर कपूर ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याचे वृत्त आहे.
'लाल सिंह चड्ढा' नंतर आमिर खान त्याच्या नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहे. आमिरच्या या नव्या प्रोजेक्टमध्ये त्याच्यासोबत रणबीर कपूर दिसणार आहे. आमिर आणि रणबीर एका चित्रपटात एकत्र दिसण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी रणबीर कपूर आमिर खानचा सुपरहिट चित्रपट 'पीके' (2014) मध्ये छोट्या भूमिकेत दिसला होता.
पीकेत केलेला रोल
'पीके' चित्रपटात रणबीर कपूरने कॅमिओ केला होता. आता पुन्हा एकदा आमिर आणि रणबीर एकत्र काम करणार आहे. आमिरच्या पुढील प्रोजेक्टबाबत अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. आमिर आणि रणबीर लवकरच या नव्या संभाव्य प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहेत. आमिर खानचा बहुप्रतिक्षित 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. दोन्ही चित्रपट एकाच दिवशी चित्रपटगृहात दाखल होणार आहेत.
हेही वाचा - Ishaan Ananya Break Up : ईशान खट्टर अनन्या पांडेचे झाले ब्रेकअप