मुंबई - 12th fail ott release : अभिनेता विक्रांत मॅसी स्टारर आणि विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित 'ट्वेल्थ फेल'नं थिएटरमध्ये धमाल केल्यानंतर आता ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. चाहते खूप दिवसांपासूनन ओटीटीवर या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत होते. विक्रांत मॅसी आणि विधू विनोद चोप्राच्या या चित्रपटानं प्रेक्षकांच्या हृदयावर अमिट छाप सोडली आहे. आता नवीन वर्ष सुरू होण्याआधी चाहत्यांना हा चित्रपट ओटीटीवर पाहण्याची संधी मिळेल. अलीकडेच डिस्ने प्लस हॉटस्टारनं घोषणा केली की, 'ट्वेल्थ फेल' चित्रपट या महिन्यात 29 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'ट्वेल्थ फेल' हा चित्रपट कुठे होणार प्रदर्शित : विधू विनोद चोप्रा यांच्या बायोपिक ड्रामा 'ट्वेल्थ फेल' नं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. हा चित्रपट अनेकांना खूप आवडला. आयपीएएस (IPS) अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि आयआरएस अधिकारी श्रद्धा जोशी यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात मेधा शंकर, अनंत व्ही जोशी, अंशुमन पुष्कर आणि प्रियांशू चॅटर्जी यांनी विक्रांत मॅसीसोबत काम केलं आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून चांगली प्रशंसा मिळाली. आता दोन महिन्यानंतर हा चित्रपट सुट्टीच्या काळात रिलीज होत आहे, त्यामुळं अनेकजण खूप खुश आहेत. डिस्ने प्लस हॉटस्टारनं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत आहेत.
'ट्वेल्थ फेल'नं केली बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई : 'ट्वेल्थ फेल' चित्रपटाची कहाणी चंबळमध्ये राहत असलेल्या आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्माच्या प्रेरणादायी प्रवासाभोवती फिरणारी आहे. या चित्रपटामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना आणि संघर्ष दाखविला गेला आहे. विधू विनोद चोप्रा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटानं अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करून सर्वांनाच चकित केले. 20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं 62 कोटींचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला. हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वजण विक्रांत मॅसीच्या अभिनयाचे चाहते झाले. या चित्रपटात त्यानं मनोज कुमार शर्मा यांची भूमिका साकारली आहे.
हेही वाचा :