ETV Bharat / entertainment

पाहा, कॅटरिना विकीचे अज्ञात ठिकाणावरील हॉलिडे फोटो - कॅटरिना विकीचे हॉलिडे फोटो

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीवर आहेत. तिथून कॅटरिना कैफने मस्त फोटो शेअर केले आहेत.

कॅटरिना विकीचे अज्ञात ठिकाणावरील हॉलिडे फोटो

author img

By

Published : Mar 31, 2022, 5:09 PM IST

मुंबई - बॉलीवूडची सुंदर जोडी कॅटरिना कैफ आणि विकी कौशल सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीवर आहेत आणि खूप एन्जॉय करत आहेत. सध्या ते कुठे सुट्टी एन्जॉय करत आहेत हे या जोडप्याने सांगितलेले नाही. गुरुवारी कॅटरिना कैफने सोशल मीडियावर तिच्या व्हेकेशनमधील सुंदर फोटो चाहत्यांसाठी शेअर केले. या फोटोंना या जोडप्याच्या चाहत्यांनी बिनदिक्कतपणे पसंती दिली आहे. लग्नापासूनच कॅटरिना पती विकी कौशलसोबत असे फोटो शेअर करत असते, ज्यामुळे तिचे चाहते खूश आहेत.

कॅटरिना कैफ
कॅटरिना कैफ

कॅटरिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या हॉलिडेचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कॅटरिना आणि विकी आलिशान बोटीचा आनंद लुटताना दिसत आहेत. कॅटरिनाने सनग्लासेस लावला आहे आणि विकी तिच्या मांडीवर झोपला आहे. हे फोटो शेअर करत कॅटरिनाने इमोजी लावले आहे.

कॅटरिना विकीचा अज्ञात ठिकाणावरील हॉलिडे
कॅटरिना विकीचा अज्ञात ठिकाणावरील हॉलिडे

कॅटरिना-विक्कीचे राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये गेल्या वर्षी ९ डिसेंबरला शाही लग्न झाले होते. या विवाह सोहळ्यात कुटुंबातील सदस्य, जवळचे नातेवाईक आणि खास मित्र उपस्थित होते. लग्न झाल्यापासून हे जोडपे सतत त्यांच्या कामाचे आणि घरातील फोटो शेअर करत आहेत. याआधी या जोडप्याच्या होळी सेलिब्रेशनचे फोटो समोर आले होते.

कॅटरिना विकीचे हॉलिडे फोटो
कॅटरिना विकीचे हॉलिडे फोटो

कपलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कॅरिना कैफ सध्या 'मेरी ख्रिसमस', 'फोन भूत' आणि 'जी ले जरा' या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. तर विकी कौशल त्याच्या पुढच्या चित्रपटात सारा अली खानसोबत दिसणार आहे. त्याच्या हातात 'गोविंदा नाम मेरा' हा चित्रपटही आहे.

हेही वाचा - अमिताभ रश्मिका फोटो : बिगबींनी लिहिले 'पुष्पा'..चाहते म्हणाले, 'ही तर श्रीवल्ली'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.