ETV Bharat / elections

विनायक मेटेंनी आधी भाजपची आमदारकी सोडावी, भाजप जिल्हाध्यक्षांचा मेटेंवर प्रतिहल्ला - munde

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर रमेश पोकळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पोकळे म्हणाले, की मेटे मराठा कार्ड पुढे करुन स्वार्थी राजकारण करत आहेत. दरम्यान, मेटे आणि मुंडे यांच्यामध्ये नेहमीच कुरघोडीचे राजकारण जिल्ह्यात पाहायला मिळते.

रमेश पोकळे
author img

By

Published : Apr 13, 2019, 10:08 AM IST

बीड - ज्या विनायक मेटेंना गोपीनाथ मुंडेंनी आमदारकी दिली, तेच आता पंकजा मुंडेंवर बिनबुडाचे आरोप करत आहेत. मेटेंनी आधी भाजपच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, नंतर पंकजांवर आरोप करावेत. मेटे स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केले.

बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी पत्रकार परिषद घेतली

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर रमेश पोकळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पोकळे म्हणाले, की मेटे मराठा कार्ड पुढे करुन स्वार्थी राजकारण करत आहेत. दरम्यान, मेटे आणि मुंडे यांच्यामध्ये नेहमीच कुरघोडीचे राजकारण जिल्ह्यात पाहायला मिळते. या आधीही दोघांमध्ये अनेक प्रकरणात वाद झडले होते.

बीड सोडून युतीला पाठिंबा देऊ, असा पावित्रा विनायक मेटे यांनी काही दिवसांपूर्वीच घेतला होता. पण, भाजपच्या नेत्यांनी असे करता येणार नसल्याची सक्त ताकीद दिली होती. त्या पार्श्वभूमीवर मेटे काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार होते. आता मेटेंच्या निर्णयामुळे सर्व चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्याविरोधात मेटेंनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

विनायक मेटे यांनी पंकजा मुंडेंवर आरोप केले आहेत. ते म्हणाले, की पंकजा मुंडे बीड जिल्ह्यात शिवसंग्राम संपवण्याच्या तयारीत आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या नेत्यांनी फितुरी केली नसती, तर मी तेव्हाच आमदार झालो असतो. त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि काही पदाधिकाऱ्यांनी माझ्या विरोधात प्रचार केला.

Intro:आ. विनायक मेटे यांनी अगोदर भाजपने दिलेल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा व नंतर पंकजा मुंडे वर आरोप करावेत-रमेश पोकळे

बीड- ज्या विनायक मेटे यांना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी आमदारकी दिली तेच मेटे आता मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. आ. विनायक मेटे यांनी अगोदर भाजपने दिलेल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा,व नंतर मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर आरोप करावेत. मराठा कार्ड पुढे करून स्वतःचा स्वार्थ साधून घेण्याचं काम विनायक मेटे करत असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला आहे.

Body:शिवसंग्राम चे आ. विनायक मेटे हे राज्यात भाजप बरोबर काम करत असले तरी बीड जिल्ह्यात मात्र भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. यामुळे मंत्री पंकजा मुंडे यांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील चार वर्षाच्या काळात आ. विनायक मेटे व मंत्री पंकजा मुंडे यांच्यात राजकीय कुरघोडी सातत्याने सुरू आहेत. बीड जिल्ह्यातील आमदार मेटे पंकजा मुंडे यांचा राजकीय वाद स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सोडवू शकलेले नाहीत. याचा फटका आता पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा निवडणुकीमध्ये बसण्याची शक्यता आहे. राज्यभरात जरी शिवसंग्राम भाजपचा घटक पक्ष म्हणून काम करत असला तरी बीडमध्ये मात्र भाजपच्या विरोधात आमदार विनायक मेटे यांनी भूमिका घेतली असून बीड लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या विरोधात मेटे यांनी प्रचार सुरू केला आहे बुधवारी झालेल्या संघर्ष मेळाव्यात आमदार मेटे यांनी पंकजा मुंडे वर आरोप करताना म्हटले होते की, पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यात शिवसंग्राम संपवण्याच्या तयारीत आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर भाजपमधील नेत्यांनी गद्दारी केली नसती तर मी तेव्हाच आमदार झालो असतो, मात्र भाजपचे जिल्हाध्यक्ष व इतर काही लोक यांनी माझ्या विरोधात प्रचार केला. असा आरोपही त्यांनी केला होता.

Conclusion:विनायक मेटे यांच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी शुक्रवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आ. विनायक मेटे यांनी भाजपने दिलेल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा व नंतरच पंकजा मुंडे यांच्यावर आरोप करावेत अशी मागणी पत्रकार परिषदेतून रमेश पोकळे यांनी केली आहे. यावेळी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष स्वप्निल गलधर यांची उपस्थिती होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.