ETV Bharat / elections

मुंडे भगिनींना वंजारी नागरिकांची किंमत राहिली नाही, विजय केंद्रे यांनी आरोप करत सोडली भाजप - beed

बीड लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. केज विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे ठिकठिकाणी कॉर्नर बैठका घेत आहेत. त्याचवेळी भाजपमधील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याचा प्रयत्नही ते करत आहेत. केज मतदारसंघातील होळ सर्कलच्या भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत विजय केंद्रे यांनी प्रवेश केला
author img

By

Published : Apr 16, 2019, 11:08 AM IST

बीड - पंकजा मुंडे यांचे समर्थक विजय केंद्रे यांनी मतदान अगदी तोंडावर आले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे केज विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंसाठी हा धक्का मानला जात आहे. विजय केंद्रे हे भगवान युवासेनेचे संस्थापक असून लोकनेते गोपिनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सुतगिरणीचे संचालक आहेत. मुंडे भगिनींना सर्वसामान्य वंजारी नागरिकांची किंमत राहिली नाही, अशी टीका केंद्रे यांनी केली आहे.

बीड लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. केज विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे ठिकठिकाणी कॉर्नर बैठका घेत आहेत. त्याचवेळी भाजपमधील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याचा प्रयत्नही ते करत आहेत. केज मतदारसंघातील होळ सर्कलच्या भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला. विजय केंद्रे यांच्यासह बाबासाहेब घुगे, ज्ञानोबा शिंदे, श्रीमंत शिंदे, बिभीषण शिंदे, उत्तरेश्वर राख यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

मुंडे भगिनींना वंजारी समाजातील सर्वसामान्य नागरिकांची किंमत राहिलेली नाही. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला असे केंद्रे पक्षप्रवेशानंतर म्हणाले. केंद्रे हे केज उपजिल्हा रुग्णालय अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत. यामुळे होळ गटात भाजपला मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Intro:खालील बातमीचे फोटो डेस्क च्या व्हाट्सअप ग्रुप वर सेंड केले आहेत

*********************
पंकजा मुंडे यांच्या बालेकिल्ल्यातच धनंजय मुंडे यांनी लावला सुरुंग; भगवान युवासेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय केंद्रे राष्ट्रवादीत दाखल

बीड- बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे आता काही तासच उरले आहेत. अशा स्थितीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या बालेकिल्ल्यातच फोडा- फोडीचा सुरुंग लावला आहे. केज उपजिल्हा रुग्णालय अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष तथा भगवान युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय केंद्रे यांच्यासह होळ येथील ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. केज विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांना हा मोठा धक्का आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर विजय केंद्रे म्हणाले की मुंडे भगिनींना वंजारी समाजाची काहीच किंमत राहिली नाही. म्हणून आम्ही भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे केज विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आमदार संगीता ठोंबरे या आहेत. शिवाय विजय केंद्रे हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे संचालक देखील आहेत.

Body:बीड लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आहे. केज विधानसभा मतदारसंघात ठिकाणी धनंजय मुंडे यांनी कॉर्नर बैठक घेऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी भाजप नेते तथा भगवान युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय केंद्र यांच्यासह येथील ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब घुगे, ज्ञानोबा शिंदे, श्रीमंत शिंदे , बिभीषण शिंदे, उत्तरेश्वर राख, आदी कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बर्दापूर तालुका अंबाजोगाई येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. प्रवेशानंतर च्या भाषणात विजय केंद्रे म्हणाले की दोन्ही मुंडे भगिनींना वंजारा समाजातील सर्वसामान्य नागरिकांची किंमत राहिलेली नाही त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहोत. अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

Conclusion:केज विधानसभा मतदारसंघात होळ गटांमध्ये भाजपला मोठे खिंडार पडले असल्याचे चित्र आहे. बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे व भाजपच्या उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या तुल्यबळ लढत होत आहे. कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीतच धनंजय मुंडे यांनी केज विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांना धक्का देत विजय केंद्रे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेतला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.