ETV Bharat / crime

Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना 5 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी - NIA

अमरावतीतील उमेश कोल्हे हत्या प्रकरणात ( Umesh Kolhe Murder Case ) एनआयएने सर्व 7 आरोपींना अटक ( NIA Arrested 7 Accused ) केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता, 5 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने एनआयएला ( NIA ) दिल्यानंतर या प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टामध्ये आज हजर करण्यात आले होते. या हत्येचा संबंध भाजप प्रवक्त्या ( Former BJP Spokesperson Nupur Sharma ) नुपूर शर्मा यांच्या पोस्टवरून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

Bombay Sessions Court
मुंबई सत्र न्यायालय
author img

By

Published : Jul 22, 2022, 5:56 PM IST

मुंबई : भाजपचे माजी प्रवक्ता नुपूर शर्मा ( Former BJP Spokesperson Nupur Sharma ) यांनी मुस्लिम समाजाच्या धर्मगुरू मोहम्मद पैगंबर विरोधात वक्तव्य केले होते. याला समर्थन करणारे पोस्ट करणारे ( Umesh Kolhe ) अमरावतीतील उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एनआयए 7 आरोपींना अटक करण्यात ( NIA Arrested 7 Accused ) आली होती. आज सर्व आरोपींची ( NIA ) एनआयए कोठडी संपत असल्याने सर्वाना न्यायालयात हजर करण्यात आला होते. या आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता 5 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी : या प्रकरणाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने एनआयएला दिल्यानंतर या प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टामध्ये आज हजर करण्यात आले होते. या आरोपींना दोन वेळा एनआयए कोठडी देण्यात आली होती. आज कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, एनआयएकडून पुन्हा आरोपींची कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, आरोपींच्या वकिलांकडून विरोध ठेवण्यात आल्यानंतर अखेर न्यायालयाने या सर्व आरोपींची 5 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

आरोपींचे दहशतवादी संघटनेशी संबंध : एनआयएने कोर्टात म्हटले आहे की, या आरोपींचे दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे अनेक पुरावे तपासादरम्यान सापडले आहेत. सध्या आरोपींची कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे. या संदर्भात खुलासा करता येणार नाही. मात्र, या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असू शकतो याकरिता या सर्व आरोपींना 7 दिवसांची एनआयए कोठडी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या आरोपींविरोधात दहशतवादी संघटनेची संबंधित UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींची नावे पुढीलप्रमाणे : एनआयएकडून आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये इरफान खान (32), मुदस्सर अहमद उर्फ ​​सोनू रजा शेख इब्राहिम (22), शाहरुख पठाण उर्फ ​​बादशाशा हिदायत खान (25), अब्दुल तौफिक उर्फ ​​नानू शेख तस्लीम (24), शोएब खान उर्फ ​​भुर्या साबीर खान (22), अतीब रशीद आदिल रशीद (22), युसूफ खान बहादूर खान (44) यांचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण : नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावसायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आले आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, आज तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचे ट्विट केले आणि त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली.

हेही वाचा : Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राणांचा कार्यकर्ता; फेसबूकवर नवनीत राणांच्या अनेक पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.