ठाणे : वेळेवर सासऱ्याला नाश्ता न दिल्याच्या शुल्लक कारणावरून संतप्त सासऱ्याने चक्क आपल्याच सुनेवर परवानाधारक रिव्हॉल्वरमधून गोळीबार केल्याचा ( Accused Fired On Daughter In Law ) धक्कादायक प्रकार गुरुवारी ६-१५ वाजण्याच्या सुमारास घडला. गोळीबारात सुनेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, आरोपी सासरा काशिनाथ पाटील याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दिली. सासरा आरोपी पाटील याच्या मागावर पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. अधिक तपास राबोडी पोलीस करत ( Rabodi Police Station ) आहेत.
खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष : ठाण्याच्या राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विहंग शांतीवन अपार्टमेंट, इमारत क्र ७, ऋतुपार्क जवळ ठाणे या सोसायटीमध्ये काशिनाथ पाटील यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. दरम्यान आरोपी काशिनाथ पाटील यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेकडे मोठी सून सीमा पाटील दुर्लक्ष करत होती. हीच माहिती मोठी सून सीमा हिच्या कानावर आली. देखभाल करूनही उपयोग नाही, सासरे अरब करत असल्याच्या भावनेतून सीमा पाटील हिने आरोपी सासरा काशिनाथ पाटील याला नाश्ता दिला नाही. यावरून भांडणे होऊ लागली. असाच प्रकार घटनेच्या दिवशी गुरुवार १४ एप्रिल रोजी संध्याकाळी ६-१५ वाजण्याच्या सुमारास घडला. त्यावेळी सासरा काशिनाथ पाटील याने त्याच्याजवळील परवानाधारक रिव्हॉल्वरमधून सून सीमा हिच्या पोटावर गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या सीमा पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
अन् असंतोषाला फुटले तोंड : ७६ वर्षीय आरोपी काशिनाथ पाटील यांनी आपली सून सीमा ही सासऱ्याच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करत असल्याची अफवा पसरवली. सादर अफवेच्या चर्चेचे पीक उगवले आणि मोठी सून असलेल्या सीमा पाटील हिच्या कानावर आले. सासऱ्याची सेवा केल्यानंतरही नावाची दवंडी पिटविणाऱ्या सासरा काशिनाथ पाटील आणि सून सीमा पाटील यांच्यात वादविवाद होऊ लागले. अखेर सून मृतक सीमा होणे सासरे काशिनाथ पाटील याना नाश्ता देणे बंद केले. पाटील यांचा संताप अनावर होत होता. असाच प्रकार गुरुवारी घडला आणि काशिनाथ पाटील यांच्या संतापाचा बांध तुटला. रागाच्या भरात पाटील यांनी परवानाधारक रिव्हॉल्वरमधून सीमाच्या पोटावर गोळीबार करून पोबारा केला. राबोडी पोलीस ठाण्यात काशिनाथ यांचयवर प्रथम जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आणि नंतर हत्यांचा गुन्हा दाखल केला.
रुग्णालयात झाला मृत्यू : गुरुवारी संध्याकाळी केलेल्या गोळीबारात मोठी सून सीमा पाटील गंभीर जखमी झाली. प्रथम तिला जवळच्या स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने सीमा पाटील याना उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान सीमाचा मृत्यू झाला. राबोडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा आरोपी काशिनाथ पाटील यांच्या विरोधात दाखल करण्यात आला.
हत्येतील रिव्हॉल्वर जप्त.. आरोपी पसार : गुरुवारी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर, पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र गुजर, सपोनि. अविनाश येवला, योगेश धोंगडे यांनी हजार राहून घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येत वापरण्यात आलेली परवानाधारक रिव्हॉल्वर हे जप्त केले. गोळीबार करून आरोपी काशिनाथ पाटील याने पोबारा केला. तर राबोडी पोलिसांनी विविध तीन पथके बनवून आरोपीला अटक करण्यासाठी रवाना झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राबोरी पोलीस ठाण्याचे संतोष घाटेकर यांनी दिली. लवकरच आरोपीला अटक करण्याचा पोलिसांनी विश्वास व्यक्त केला आहे.
हेही वाचा : लॉजमध्ये अल्पवयीन प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या