ETV Bharat / city

धक्कादायक ! चालकावर संशय आल्याने तरुणीने चालत्या रिक्षातून मारली उडी - रिक्षा

मुलुंडमध्ये रिक्षा चालकाच्या हालचाली पाहून तरुणीला संशय आला. त्यामुळे भीतीपोटी तरुणीने चालत्या रिक्षातून उडी मारली.

young girl jumped from running auto rickshaw
तरुणीने चालत्या रिक्षातून मारली उडी
author img

By

Published : Feb 15, 2020, 6:57 AM IST

ठाणे - मुलुंडमध्ये एका वीस वर्षीय तरुणीने रिक्षा चालकाचा संशय आल्याने चालत्या रिक्षातून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चालक आपल्याकडे अश्लील नजरेने पाहत असून तो चुकीच्या दिशेने रिक्षा नेण्याचा प्रयत्न करत आहे. हे लक्षात येताच, सदर युवतीने समय सूचकता दाखवत रिक्षातून उडी मारली. गुरूवारी रात्री मुलुंडमध्ये ही घटना घडली.

मुलुंडच्या संभाजीनगर विभागात ही तरुणी राहते. गुरुवारी रात्री ती मुलुंड कॉलनी परिसरातील तिच्या भावाकडे कामानिमित्त गेली होती. रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान तरुणी त्या विभागातून रिक्षाने तिच्या घराकडे येत होती. परंतु ती ज्या रिक्षाने प्रवास करत होती, त्या रिक्षाचा चालक हा वारंवार रिक्षाच्या आरशातून तरुणीकडे अश्लील नजरेने पाहत होता. हि बाब तरुणीच्या लक्षात आली.

हेही वाचा... जळगावातील 'त्या' बालिकेचा खूनच; अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल

त्यातच तरुणीने मुलुंडच्या पंचरत्न मंदिराकडे रिक्षा चालकाला रिक्षा नेण्यास सांगितली असता चालकाने रिक्षा दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणीने समय सूचकता दाखवत गतिरोधक आल्यावर जेव्हा रिक्षाचा वेग कमी झाला, तेव्हा चालू रिक्षातून उडी मारली.

उडी मारल्यानंतर तरुणीच्या डोक्याला दुखापत देखील झाली. हि घटना पाहत असलेल्या काही स्थानिकांनी या तरुणीला पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर तरुणीने मुलूंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच सध्या मुलुंड पोलीस या रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.