ठाणे - महापालिका हद्दीत सुमारे 25 लाखांची लोकसंख्या आहे. मात्र, लसीकरण मोहिमेत केवळ 3 लाख 50 हजार ठाणेकरांचे लसीकरण पालिका प्रशासनाला विविध केंद्रावर करण्यात यश मिळाले. लसींच्या अभावाने लसीकरणाच्या मोहिमेला ब्रेक लागला आहे. ठाणेकरांची ग्लोबल टेंडर काढून पाच लाख लसींची मागणी करणार आहे. त्यासाठी ग्लोबल टेंडरची प्रक्रिया सुरू आहे. मुंबई प्रमाणे ठाणे पालिकाही ग्लोबल टेंडर काढण्याची लवकरच प्रक्रिया पूर्ण करणार आहे. त्यानंतर निविदाकारांचा प्रतिसाद मिळण्यावर सर्वकाही अवलंबून आहे. त्यामुळे ठाणेकरांना लसीसाठी प्रतीक्षाच करावी लागणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांनी दिली.
ठाण्याची 25 लाखांची लोकसंख्या असलेल्या पालिका प्रशासनाला ठाणेकरांचे लसीकरण करण्यासाठी 50 लाख लसींची गरज आहे. आतापर्यंत 3 लाख 50 नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. तरीही ठाण्यासाठी किमान 40 ते 42 लाख डोसची गरज आहे. त्यासाठीच ठाणे पालिकेने लस खरेदीची तयारी ठेवून 5 लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्यात येणार आहे. मात्र, त्याची अवस्थाही मुंबई पालिकेच्या ग्लोबल टेंडर प्रमाणेच असल्याने लसीचा दर कंपनी काय देतात यावर सर्व अवलंबून आहे. संपूर्ण ठाणेकरांच्या लसीकरणासाठी आता चक्क पालिका आयुक्तही लसीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.
ग्लोबल टेंडर प्रक्रियेची तयारी
लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याच्या तयारीत ठाणे पालिकाही आहे. लवकरच हे टेंडर काढण्यात येणार आहे. त्याला महासभेत मंजुरी घेऊन टेंडर भरण्यात येणार आहे. एक ते दोन दिवसात टेंडर कोट करण्यात येणार आहे. त्यानंतर टेंडरमध्ये किती निविदाकार इंटरेस्ट दाखवितात लसींचा दर काय देतात हे समजणार आहे. निवेदिकारानी आपले लसींचे दर स्पष्ट केल्यानंतर सदरची प्रक्रिया पूर्ण करून लसींचा साठा उपलब्ध होणार आहे. लसींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर ठाणेकरांच्या लसीकरणाचा प्रश्न सुटणार आहे.
कोरोना निपटण्यासाठी लसीकरण परिणामकारक कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या अनुभवानुसार येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने ठाणे पालिका तयारी करीत आहे. दरम्यान कोरोनावर मात करण्यासाठी हे मोठे अस्त्र ठरल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सध्या पालिकेचे 5 लाख लसींचे नियोजन आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करून लोकांना डोस देणे महत्वाचे आहे. कारण, कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी उपाययोजना ठरलेली आहे.
हेही वाचा - मनसे नेत्याचे चक्क कचऱ्यात बसून आंदोलन