ठाणे : ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो कारण ठाणे महानगरपालिकेने ( Thane Municipal Corporation ) शिवसेनेला सर्वात पहिली सत्ता दिली. आता ठाणे महानगरपालिकेतील जवळ जवळ सर्वच नगरसेवकांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ( Meeting of Chief Minister Eknath Shinde ) घेतली. ठाणे महापालिकेतील 67 नगरसेवकांपैकी 66 नगरसेवकांनी ( corporators met Chief Minister Eknath Shinde )काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यात जाऊन त्यांचे अभिनंदन केले.
ठाण्यात दुफळीची शक्यता : ठाणे महापालिकेचे 66 नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी झाले. यामध्ये माजी महापौर नरेश मस्के समवेत हे सगळे नगरसेवक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. 67 नगरसेवकांपैकी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे हे मात्र शिवसेनेतच आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट, अशी दुफळी ठाण्यात निर्माण झाल्याचे चित्र या भेटीमुळे दिसून येत आहे. शिवसेनेकडून राजन विचारे यांची भावना गवळींच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे.
सुरुवातीपासूनच ठाणे व्यक्तिनिष्ठ : ठाणे जिल्हा हा सुरुवातीपासूनच व्यक्तिनिष्ठ असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या काळात आनंद दिघे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांना व्यक्तिशः मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि यामुळेच महानगरपालिकेची पूर्ण सत्ता हातात असताना शिवसेनेमधून 66 नगरसेवक बाहेर पडून एकनाथ शिंदे यांचे समर्थन करीत आहेत.
राजाने विचारे यांचा विरोध का : ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी आतापर्यंत एकनाथ शिंदे गटाला समर्थन दिलेले नाही, ते शिवसेनेतच आहेत आणि यामुळेच काल संजय राऊत यांनी भावना गवळी यांना हटवून त्यांची नियुक्ती तेथे केली होती. राजन विचारे यांच्या पत्नी ह्या महानगरपालिकेतील नगरसेवक आहेत. त्यांना वगळून सर्व नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला असला, तरी राजन विचारे यांचा विरोध हा भविष्यात महत्त्वाचा रोल निघू शकतो.
हेही वाचा : Shivsena MP Join Eknath Shinde Group : शिवसेनेचे ११ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?