ETV Bharat / city

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे जिल्हा प्रशासन हतबल - Thane Oxygen Shortage

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने, कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. तसेच ऑक्सिजनचीही कमतरता भासत आहे. त्यामुळे ओडीसा राज्यातून ऑक्सिजन मिळवता येणार असल्याची माहीती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

ओडीसा राज्यातुन ऑक्सिजन मागवण्यात येणार असल्याची पालकमंत्र्यांची माहीती

author img

By

Published : Apr 22, 2021, 8:56 AM IST

ठाणे - जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. जिल्ह्यात या घडीला 300 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असून, दिवसाला निव्वळ 180 ते 200 च्या आसपास ऑक्सिजनचा सध्या पुरवठा होत आहे. त्यामुळे येत्या काळात ओडीसातून ऑक्सिजन मिळवता येणार आहे, दरम्यान जसा ऑक्सिजन येईल तसा इतर जिल्ह्यात देखील पुरवठा करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासन सांगत आहे.

ओडीसा राज्यातून ऑक्सिजन मिळवता येणार

ऑक्सिजन साठ्यापैकी उपलब्ध साठा कमीच

जिल्ह्यात आयनोक्स, लिंडे आणि जेएसडब्लू या खासगी कंपनीमधून ऑक्सिजन पुरवठा केला जातो. सध्या आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन साठ्यापैकी उपलब्ध साठा कमीच असून एकप्रकारे चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच जिल्यातील अनेक रुग्णालयात प्रचंड प्रमाणात रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी देखील जास्त असल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले.

पालकमंत्री करत आहेत धावपळ

ओडीसा राज्यात दोन प्रमुख शहरात ऑक्सिजन प्लांट असून कंपनी व्यवस्थापनाशी जिल्हा प्रशासन चर्चा करत आहे. त्यामुळे लवकरच तिकडून मदत मिळेल असा विश्वास प्रशासनाला आहे. राज्याला ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी सरकार काम करत आहे. याच अनुषंगाने ओडीसा राज्यात असणाऱ्या राऊकेला आणि अंगुर या दोन जिल्ह्यात टाटा स्टील चे दोन प्लांट आहेत. या प्लांटमधून दिवसाला 140 टन ऑक्सिजन मागविण्यात येणार आहे. तसे त्या कंपनी व्यवस्थपकांनी मान्य केले असून एमएमआरडीए क्षेत्रात ते पुरव्यात येणार आहे, अशी माहीती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

हेही वाचा - Maharashtralockdown : राज्यात आजपासून कडक निर्बंध लागू; नवीन नियमावली जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.