ETV Bharat / city

धक्कादायक; मुंब्र्यात शेजाऱ्याचे भांडण सोडवताना जमावाची पोलिसांवर दगडफेक, वाहनाची तोडफोड

मांजरीला घरात ठेवा, अशी तक्रार सोसायटीमध्ये राहात असलेल्या यास्मिन खानच्या भावाने पटेल कुटुंबाकडे केली होती. त्यावरुन शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केली.

police
जमावाला पांगवताना पोलीस
author img

By

Published : May 15, 2020, 7:42 PM IST

Updated : May 15, 2020, 8:34 PM IST

ठाणे - क्षुल्लक वादात एकमेकांशी भिडलेल्या शेजाऱ्यांची हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच जमावाने दगडफेक करुन ह्ल्ला केला. ही घटना बुधवारी सायंकाळी मुंब्रा परिसरात घडली. या हल्ल्यात काही पोलीस जखमी झाले असून पोलिसांच्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी गुरूवारी 40 ते 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक; मुंब्र्यात शेजाऱ्याचे भांडण सोडवताना जमावाची पोलिसांवर दगडफेक, वाहनाची तोडफोड

मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील फेमस कॉलनी परिसरातील साईकिरण सोसायटीमध्ये तिसऱ्या मजल्यावर नासीर पटेल कुटुंबीय राहतात. या पटेल कुटुंबाच्या घरातील मांजरीचा त्रास त्यांच्या शेजाऱ्याला होतो. मांजरीला घरात ठेवा, अशी तक्रार सोसायटीमध्ये राहात असलेल्या यास्मिन खानच्या भावाने पटेल कुटुंबाकडे केली होती. त्यावरून उद्भवलेल्या वादावादीत नासीर पटेल तसेच, त्याची मुले फहाद, फरहान, परेश, फराज, जरीना आणि आरीफ पतंगवाला यांनी लोखंडी रॉड, लाकडी बांबू आणि सळईने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी परेश याने मोबाईल हिसकावला तर, फहादने विनयभंग केल्याची तक्रार यास्मीन खानने दाखल केली आहे.

दोन्ही कुटुंबातील भांडण सोडवण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक बोरसे यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तेव्हा, पोलीस शिपाई मयूर लोखंडे तसेच अन्य पोलिसांच्या दिशेने जमावाने तुफान दगडफेक केली. यात मयूरच्या पायाला मार लागला असून, पोलीस शिपाई परब यांच्या दुचाकीचे नुकसान झाले. घटनेचे चित्रण करत असलेल्या इस्माईल खानचा कॅमेरा अनोळखी व्यक्तीने लांबवला. याप्रकरणी, लोखंडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन शादाब खान, हैदर खान, शोहेब खान, रमजान इदरिसी, हसीब शेख, नदीम कुरेशी, इब्राहिम खान, यासीन कुरेशी, अब्दूल छत्रीवाला, मोहम्मद तारीख जाफरानी, सुफीयान खान, काशिफ, सुफियान खान, आरीफ पतंगवाला यांच्यासह 40 ते 50 अनोळखी व्यक्तीविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात हे करत आहेत.

Last Updated : May 15, 2020, 8:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.