ETV Bharat / city

भाजपला धक्का..! उल्हासनगरमध्ये टीम ओमी कलानींच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा महापौर विराजमान - उल्हासनगर महानगरपालिका

टीम ओमी कलानींच्या पाठिंब्यावर भाजपने अडीच वर्ष सत्ता भोगली. मात्र, टीम ओमी कलानींच्या पंचम कलानी यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट नाकारल्याने टीम ओमी कलानीने महापौर निवडणुकीत भाजपचा वचपा काढला आहे. शिवसेनेच्या लिलाबाई अशान यांना ४३ मते मिळून त्या महापौरपदी निवडून आल्या. तर भाजप आणि मित्रपक्ष उमेदवार जीवन ईदनानी यांना ३५ मते मिळाली.

लिलाबाई अशान
author img

By

Published : Nov 22, 2019, 5:10 PM IST

ठाणे- राज्यातील नव्याने तयार झालेल्या राजकीय समीकरणामुळे उल्हासनगर महापालिकामध्ये भाजपला फटका बसला आहे. महाविकास आघाडीने सत्ता काबीज करीत लिलाबाई अशान महापौरपदी विराजमान झाल्या.

विशेष म्हणजे टीम ओमी कलानीच्या पाठिंब्यावर भाजपने अडीच वर्ष सत्ता भोगली. मात्र, टीम ओमी कलानीच्या पंचम कलानी यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट नाकारल्याने टीम ओमी कलानीने महापौर निवडणुकीत भाजपचा वचपा काढला आहे. शिवसेनेच्या लिलाबाई अशान यांना ४३ मते मिळून त्या महापौरपदी निवडून आल्या. तर भाजप आणि मित्रपक्ष उमेदवार जीवन ईदनानी यांना ३५ मते मिळाली. यामुळे भाजपचे माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपला मोठा झटका लागल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या लिलाबाई अशान

उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचे रिपाईचे भगवान भालेराव यांना ४४ मते मिळाली तर भाजपचे विजय पाटील यांना ३४ मते मिळाली. खळबळजनक बाब म्हणजे भाजप पक्षाचा व्हीप झुगारून भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या टीम ओमी कलानींच्या ८ नगरसवेकांनी शिवसेनेच्या पारड्यात मते टाकली. महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक, निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या देखरेखीत पार पडली. यावेळी भाजपच्या गोटातील खासदार कपिल पाटील, आमदार गणेश नाईक, किसन काथोरे, या निवडणुकीपासून दूर होते. तर केवळ माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या वतीने एकट्यानेच किल्ला लढविला.

याउलट महाविकास आघाडीचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, शांताराम मोरे, कल्याण जिल्ह्याप्रमुख गोपाळ लांडगे, ग्रामीणचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे माजी खासदार आनंद परांजपेंसह मोठ्या संख्येने शिवसैनिक, राष्टवादी व रिपाईचे कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महापालिका परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, उल्हासनगर महापालिकेत एकूण ७८ नगरसेवक असून सत्ता स्थापनेसाठी ४० नगरसेवकांची मॅजिक फिगर लागते. त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक ३२ नगरसवेक, शिवसेना २५, राष्ट्रवादी ४, रिपाई ३, कॉग्रेस, भारिप, पीआरपी प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल आहे. मात्र, टीम ओमी कलानीने भाजपचा वचपा काढण्याचे ठरवल्याने त्यांच्या गटातील नगरसेवकांमुळे सत्ता स्थापन झाली. यामुळे पंचम कलानी यांना स्थायी समितीचे सभापती पद मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Intro:kit 319Body:भाजपला धक्का ! टीम ओमी कलानीच्या वचपण्याने शिवसेनेचा महापौर विराजमान

ठाणे :- राज्यातील नव्याने तयार झालेल्या राजकीय समीकरणामुळे उल्हासनगर महापालिकामध्ये भाजपला धक्का देत, महाविकास आघाडीने सत्ता काबीज करीत शिवसेनेच्या शिवसेनेच्या लिलाबाई अशान महापौरपदी विराजमान झाल्या.

विशेष म्हणजे टीम ओमी कलानीच्या पाठींब्यावर भाजपने अडीच वर्ष सत्ता भोगली. मात्र टीम ओमी कलानीच्या पंचम कलानी यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट नाकारल्याने टीम ओमी कलानीने महापौर निवडणुकीत भाजपचा वचपा काढला. आहे. शिवसेनेच्या लिलाबाई अशान यांना ४३ मते मिळून महापौरपदी निवडून आल्या. तर भाजप आणि मित्र पक्ष उमेदवार जीवन ईदनानी यांना ३५ मते मिळाली. यामुळे भाजपचे माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपला मोठा झटका लागल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही महाविकस आघाडीचे रिपाईचे भगवान भालेराव यांना ४४ मते मिळाली तर भाजपचे विजय पाटील यांना ३४ मते मिळाली. खळबळजनक बाब म्हणजे भाजप पक्षाचा व्हीप झुगारून भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या टीम ओमी कलानीच्या ८ नगरसवेकांनी शिवसेनेच्या पारड्यात मत टाकली. महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा अधिकारी राजेश नार्वेकर यांच्या देखरेखीत पार पडली. यावेळी भाजपच्या गोटातील खासदार कपिल पाटील, आमदार गणेश नाईक, किसन काथोरे, या निवडणुकी पासून दूर होते. तर केवळ माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या वतीने एकट्यानेच किल्ला लढविला, या उलट महाविकास आघाडीचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, शांताराम मोरे, कल्याण जिल्ह्या प्रमुख गोपाळ लांडगे, ग्रामीणचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटीलसह राष्ट्रवादीचे माजी खासदार आनंद परांजपेसह मोठ्या संख्येने शिवसैनिक , राष्टवादी व रिपाईचे कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडूनये म्हणून पालिका परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, उल्हासनगर महापालिकेत एकूण ७८ नगरसेवक असून सत्ता स्थापनेसाठी ४० नगरसेवकांची मॅजिक फिगर लागते. त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक ३२ नगरसवेक, शिवसेना, २५ , राष्ट्रवादी ४, रिपाई ३, कॉग्रेस, भारिप , पीआरपी प्रत्येकी १ असे पक्ष बलाबल आहेत. मात्र टीम ओमी कलानीने भाजपचा वचपा काढण्याचे ठरवल्याने त्यांच्या गटातील नगरसेवकांमुळे सत्ता स्थापन झाली. यामुळे पंचम कलानी यांना स्थायी समितीचे सभापती पद मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Conclusion:ulhasnagr
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.