ETV Bharat / city

वाढत्या उन्हामुळे पक्षी जीवनावर विपरीत परिणाम; शिवनलिनी प्रतिष्ठानतर्फे कृत्रिम पाणवठे - पाणवठे

पक्ष्यांना ग्लुकोज व प्रतिजैविकांच्या औषधांची गरज असून उडण्यास सक्षम झाल्यास रात्री नैसर्गिक अधिवासात सोडणे गरजेचे असल्याचे मत पक्षीमित्रांनी व्यक्त केले.

शिवनलिनीतर्फे कृत्रिम पाणवठे
author img

By

Published : Apr 22, 2019, 8:53 AM IST

ठाणे - वाढत्या उन्हाचा फटका मानवालाच नाहीतर पक्ष्यांनाही बसत आहे. वेळीच पाणी न मिळाल्याने अनेक पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. दरवर्षी एप्रिल महिन्यापासून उन्हाच्या झळा वाढू लागल्या की, पक्षी आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. यावर्षी मात्र मार्च महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढल्याने शहरी भागातील पक्ष्यांचे जीवनमान धोक्यात आल्याची भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे.

यावर्षी मार्चपासूनच ऊन वाढल्याने कबूतर, कोकिळा, घुबड, पोपट, सी-गल्स, घार या पक्ष्यांना त्रास होवू लागला आहे. त्यामुळे, दरवर्षीपेक्षा जास्त पक्ष्यांचे जीवनमान यंदा खालावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पक्ष्यांना ग्लुकोज व प्रतिजैविकांच्या औषधांची गरज असून उडण्यास सक्षम झाल्यास रात्री नैसर्गिक अधिवासात सोडणे गरजेचे असल्याचे मत पक्षीमित्रांनी व्यक्त केले.

शिवनलिनीतर्फे कृत्रिम पाणवठे - शिवनलिनी प्रतिष्ठानतर्फे कल्याण-डोंबिवलीतील विविध ठिकाणी पक्षांना पाणी पिण्यासाठी कृत्रिम पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली. शहरातील गणेशनगर, संगितावाडी, नांदीवली अशा विविध भागात हा उपक्रम राबविण्यात आला आहे. प्रतिष्ठानचे महाव्यवस्थापक अनिरूद्ध कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अँड. गणेश मिश्रा, जनहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश काळे, अँड. विद्या शुक्ला, अमोल काकडे, विनोद गिरी यांनी उपक्रमात सहभाग घेतला.

पक्ष्यांसाठी काय कराल? - घर अथवा इमारतीवर पाण्याची भांडी ठेवा. पाण्यात ग्लुकोज टाकल्याने पक्ष्यांना आधार मिळू शकेल. पाण्याची भांडी सावलीत ठेवावीत. या काळात इमारतींमधील पक्ष्यांची घरटी तोडू नका. शक्य झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसवा.

वाढत्या उन्हामुळे पक्षी जीवनावर विपरीत परिणाम; डोंबिवलीकर संस्थेने काढला उतारा

ठाणे :- वाढत्या उन्हामुळे अंगाची काहिली होत असल्याने फक्त माणसेच हवालदिल होत नसून याचा फटका पक्ष्यांनाही बसत आहे. मात्र, याचे पक्ष्यांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होत असून वेळीच पाणी न मिळाल्याने अनेक पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. दरवर्षी एप्रिल महिन्यापासून उन्हाच्या झळा वाढू लागल्या की पक्षी आजारी पडण्याचे प्रमाण वाढते, या वर्षी मात्र मार्च महिन्यापासूनच उन्हाचा चटका बसू लागल्याने शहरी भागातील पक्ष्यांचे जीवनमान धोक्यात आल्याची भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे.

 उन्हाळा सुरू झाल्यावर सामान्य माणसापासून प्राण्यापर्यंत सगळ्यांनाच चटके बसू लागल्याने प्रत्येक जण पाणी अथवा थंडाव्याच्या शोधात असतो. अत्याधुनिक सोयी-सुविधांमुळे माणसाच्या या गरजा तात्काळ पूर्ण होतात. मात्र, प्राणी व पक्षी यांना नैसर्गिक स्रोतांमधूनच या गरजा भागवाव्या लागत असल्याने त्यांच्यापुढे अडचणी निर्माण होतात. यात उन्हाचा जास्त फटका पक्ष्यांना बसत असल्याने त्यांच्या शरीरातील पाणी कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे उडताना अचानक खाली पडणे, तारांमध्ये अडकणे अथवा मृत्यू होणे असे गंभीर प्रकार पक्ष्यांबाबत घडतात. 
 
शहरातील हिरवळ व पाण्याचे स्रोत कमी होत असल्याने त्याचा पक्ष्यांच्या घरट्यावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच नागरिक त्यांच्या घरात अथवा इमारतीत होणारी पक्ष्यांची घरटी काढून टाकतात, त्यामुळे आधीच झाडावर घरटे करू न शकल्याने हे पक्षी बाहेर येतात व निवाऱ्याचा पर्याय न मिळाल्याने उन्हाला बळी पडतात. तसेच एखाद्या प्राणिमित्राने ठेवलेले पाणी पक्षी खराब करतील या उद्देशाने अनेक जण ते पाणी उपडे करतात, त्यामुळेही पक्ष्यांना पाणी मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

या वर्षी मार्चपासूनच ऊन वाढल्याने कबूतर, कोकिळा, घुबड, पोपट, सी-गल्स, घार या पक्ष्यांना त्रास असह्य होऊ लागला आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा जास्त पक्ष्यांचे जीवनमान यंदा खालावण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या पक्ष्यांना ग्लुकोज व प्रतिजैविकांच्या औषधांची गरज असून उडण्यास सक्षम झाल्यास रात्री नैसर्गिक अधिवासात सोडणे गरजेचे असल्याचे मत पक्षीमित्रांनी व्यक्त केले.

कबूतर व घारी अधिक आजारी : दरवर्षी अनेक पक्ष्यांवर या काळात उपचार करण्यात येतात. या वर्षी अधिक पक्षी आजारी पडण्याची शक्यता दिसते. दरवर्षी उपचार घेण्यात कबुतरांची संख्या अधिक असून घुबड, पोपट, सी-गल्स, कोकिळा घारींची संख्या सर्वाधिक आहे.

पक्ष्यांसाठी काय कराल ? : घर अथवा इमारतीवर पाण्याची भांडी ठेवण्यात यावीत. तसेच या पाण्यात ग्लुकोज टाकल्याने पक्ष्यांना आधार मिळू शकेल. ही पाण्याची भांडी सावलीत ठेवावीत तसेच त्यातील पाणी काही काळाने बदलणे आवश्यक आहे. तसेच या काळात इमारतींमधील पक्ष्यांची घरटी तोडू नका व शक्य झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसविणे आवश्यक आहे.

शिवनलिनीतर्फे कृत्रिम पाणवठे : शिवनलिनी प्रतिष्ठानतर्फे कल्याण-डोंबिवलीतील विविध ठिकाणी पक्षांना पाणी पिण्यासाठी कृत्रिम पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली. शहरातील गणेशनगरसंगितावाडी, नांदीवली अशा विविध भागात हा उपक्रम राबविण्यात आला आहे. उन्ह्याचा पारा दिवसेंदिवस चढत असून पक्षांना पाण्याची सोय उपलब्ध व्हावी आणि पाण्यावाचून पक्षांच्या जिवाचे हाल होऊ नये यासाठी हा संकल्प पुढेही सुरू ठेवणार असल्याचे प्रतिष्ठानकडून सांगण्यात आले. प्रतिष्ठानचे महाव्यवस्थापक अनिरूद्ध कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अँड. गणेश मिश्राजनहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश काळे, अँड. विद्या शुक्ला, अमोल काकडे, विनोद गिरी यांनी उपक्रमात सहभाग घेतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.