नवी मुंबई- पनवेल महापालिका क्षेत्रात शनिवारी ७२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. ३७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील नावडे येथील कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये कामोठ्यातील १४, नवीन पनवेलमधील १२, खारघरमधील १२, कळंबोलीतील ११, नवीन पनवेलमधील ९, खांदा कॉलनीतील ७, पेणधर गावातील २, नावडे येथील २, तसेच धाकटा खांदा, तळोजा फेज-१, धानसर येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका क्षेत्रातील एकूण १ हजार २६७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ८४९ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आत्तापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे ३६४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
पनवेल महापालिका क्षेत्रातील ३७ जणांना डिस्चार्ज :
३७ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये नवीन पनवेलमधील १३, खारघरमधील १०, कामोठ्यातील ७, कळंबोलीतील ४, तसेच पनवेलमधील ३ रूग्णांचा समावेश आहे.