ठाणे - दोन वर्षानंतर ठाण्यात आज बुधवार (दि. 15 डिसेंबर) शाळा सुरु होत आहेत. (Schools Reopening In Thane) करोनाचे सर्व नियम पाळत शाळा सुरू करण्याची प्रशासनानी तयारी दाखवली आहे. अनेक दिवस घरी बसलेल्या विदार्थ्यांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे. ( Primary School Reopen ) ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल शाळेत (Anand Vishwa Gurukul School) गेटवरच मुलांचे स्वागत करण्यात आले आहे.
सहमती पत्रानंतरच मुलांना शाळेत प्रवेश दिला जात आहे
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असतानाच आत ओमायक्रॉन नावाचा विषाणू आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुलांना शाळेत पाठवताना त्यांच्या पालकांचे सहमती पत्र घेतले जात आहे. (Government Corona Regulations) या सहमती पत्रानंतरच मुलांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. दरम्यान, बँडबाजा वाजवत मुलांचे शाळेत स्वागत करण्यात येत आहे.
राज्य सरकारच्या निर्देशाने करणार व्यवस्थापन
राज्य सरकार शाळा सुरु करण्यासाठी सर्व शाळा व्यवस्थापनांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश तर देत आहेत. मात्र, या आदेशाचे प्रत्यक्षात पालन होत आहे का? याच्यावरही आता राज्य सरकार लक्ष देणार आहे. अशाप्रकारे कमी क्षमतेने शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांची काळजी घेणे हे व्यवस्थापनाला बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत. सर्व शाळांनीही ही बाब मान्य केली असून त्यानुसार या लहानग्यांच्या शाळेची तिसरी घंटा वाजली आहे.
निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला होता
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा १ डिसेंबरपासून राज्यातील प्राथमिक शाळा सुरू ( Primary schools to start in Maharashtra ) करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या ( Maharashtra cabinet decision ) बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याचा निर्णय-
शिक्षकांनी काय गोष्टी केल्या पाहिजेत, यावर आम्ही अभ्यास केला आहे. आम्ही आठ दिवस पालकांशी व अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. सुरक्षित वातावरण कसे देता येईल यावर भर देणार आहोत. निवासी शाळाबाबत आम्ही लवकर निर्णय घेऊ. दिवाळीनंतर काय परिस्थिती आहे, हे पाहून आम्ही प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी पूर्ववत जीवनात यायला हवेत. त्यासाठी आम्ही आज शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाचा निर्णय आल्यानंतर आम्ही या शाळा सुरू करत आहोत. तिसऱ्या लाटेवर आमची नजर होती. मात्र, परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेतला आहे असही गायकवाड त्यावेळी बोलताना म्हणाल्या होत्या.
हेही वाचा - MPSC Exam 2021 : आता काय उपयोग! स्वप्नील लोणकरचे एमपीएससीच्या अंतिम यादीत आले नाव